ताज्या घडामोडी

कोल्हापूरमधे “नो शेव्ह….” मोहिमेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

आर्थिक दुर्बल अशा कॅन्सरग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामधील वारणानगर येथे वारणा कॅन्सर फौंडेशनच्या वतीने “नो शेव्ह नोव्हेंबर कॅम्पेन फॉर कॅन्सर पेशंट्स” ही आंतरराष्ट्रीय मोहीम राबविली जाते आहे. या मोहिमेस नागरिकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती वारणा कॅन्सर फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.अभिजीत जाधव यांनी दिली.
कॅन्सर हा दुर्धर आजार असून या आजाराशी दोन हात करीत असताना रुग्ण आणि कुटुंबाला आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.कॅन्सरवरील उपचार अतिशय महागडे असून आर्थिक दुर्बल परिस्थिती असणारे कुटुंब अक्षरशः मेटाकुटीला येते.त्यामुळे अशा कॅन्सरग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदतीचा हात देणं हे सामान्य नागरिकाचं कर्तव्य असल्याचं मत नो शेव्ह नोव्हेंबर मोहिमेचे आयोजक आणि वारणा कॅन्सर फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.अभिजीत जाधव यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यामधे 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान ही मोहीम राबविली जात असून मोहिमेचे हे 14 वेळ वर्ष असून आत्तापर्यंत 84 कॅन्सरग्रस्तांना आर्थिक मदत झालेली आहे.समाजातील सुज्ञान नागरिकांकडून आर्थिक स्वरुपामधे मदती केली जात असून,या माहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे डॉ.अभिजीत जाधव यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!