ताज्या घडामोडी

प्रा. विजय कोष्टी यांना राष्ट्र्शाहीर अमर शेख पुरस्कार

Spread the love

कवठेमहांकाळ (जि.सांगली) : प्रतिनिधी (दि.१४)

येथील पद्मभूषण वसंतराव दादा पाटील महाविद्यालयातील संख्याशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक विजय कोष्टी यांना भिमानिरा विकास संस्था आणि विश्वभारती प्रकाशन इंदापूर (जि.पुणे) यांच्या वतीने राष्ट्रशाहीर अमर शेख पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आला. राष्ट्रशाहीर अमर शेख यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त खुले कविसंमेलन आणि शैक्षणिक, पत्रकारिता,सामाजिक-सांस्कृतिक कार्य, साहित्यिक, कवी, कलाकार आदी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दहा जणांना यावेळी शाल, गुलाब पुष्प आणि स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी शैक्षणिक तसेच वृत्तपत्रलेखन क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरी बद्दल प्रा. कोष्टी यांना ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांच्या हस्ते आणि इंदापूर शहराच्या नगराध्यक्षा अंकिताताई शहा, गटनेते कैलास कदम, मुकुंद शहा यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना दरवर्षी संस्थे तर्फे सन्मानित केले जात असल्याचे भिमानिरा विकाससंस्थेचे अध्यक्ष साथी सलीम शेख यांनी सांगून यंदा शिक्षण, आरोग्य, उद्योग, साहित्यिक, कलाकार व्यवसाय, राजकारण आदी क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मान्यवरांचा संस्थे च्या वतीने सत्कार करण्यात येत असल्याचे सांगितले. यापूर्वीही प्रा. कोष्टी यांना समाजप्रबोधिनी इचलकरंजी चा आचार्य शांतारामबापू गरुड उत्कृष्ट पत्र लेखन पुरस्कार, काँग्रेस सेवादल सांगलीचा साहित्यरत्न पुरस्कार ,आम्ही कोल्हापुरी फाउंडेशनचा शैक्षणिक व वृत्तपत्र लेखन पुरस्कार, पंढरपूर तालुका पत्रलेखक संघाचा उत्कृष्ट वृत्त पत्रलेखन तसेच सोलापूर जिल्हा पत्रलेखक मंचाचा कै. तात्यासाहेब तेंडुलकर पुरस्कार, नगर वाचनालय आणि ग्रंथालय भारती साताराचा पत्रमहर्षी कै. भागवत पुरस्कार, राष्ट्रीय शिक्षक विकास परिषद गोवा चा राष्ट्रीय शिक्षक भूषण पुरस्कार, पुणे येथील काव्य मित्र संस्थेचा आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार, मोक्षा आर्ट्स आणि कृष्णाजी फाउंडेशन पुणे चा गुणनिधी समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार, नाशिक च्या भावना बहुउद्देशीय संस्थेचा नाशिकरत्न भूषण तर नाशिक च्याच ऋणमोचन सामाजिक संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार, आसाम साहित्य सभा आणि आपली मुंबई चा कै. प्रबोधनकार ठाकरे सामाजिक न्याय पुरस्कार, भारतीय समाजोन्नती संघ, मुंबई चा जयभारत राष्ट्रचेतना पुरस्कार, प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य चा कोविड योद्धा पुरस्कार, महाराष्ट्र राज्य एस.बी.सी. संघर्ष समिती चा शैक्षणिक आणि वृत्तपत्र लेखन पुरस्कार, पुणे येथील स्वरकुल ट्रस्ट चा आँनलाईन टीचर एक्स्पर्ट अवार्ड, तसेच ईगल फौंडेशन चा राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार आदी पुरस्कार मिळाले आहेत.
याप्रसंगी बोलताना प्रा. कोष्टी यांनी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, उपाध्यक्ष सुरेश पाटील, सचिव सुदर्शन शिंदे,प्र.प्राचार्य डॉ. एम. के. पाटील, प्रबंधक राजेंद्र स्वामी तसेच सर्व सहकारी प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य आणि प्रोत्साहन मिळाल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!