ताज्या घडामोडी

पालिकेच्या शाळेत बालकोत्सव लोकनृत्य स्पर्धा जल्लोषात

Spread the love

मुंबई दक्षिण विभागातील मनपा बजाज कांदिवली आर / बालकोत्सव लोकनृत्य स्पर्धा जल्लोषात पार पडली . दोनदिवसीय स्पर्धेत पालिकेच्या ८ शाळांमधील जवळपास २४० विद्यार्थ्यांनी सहभागी घेऊन कला सादर केली . या स्पर्धेस विभागाच्या प्रशासकीय अधिकारी कल्पना संखे , विभाग निरीक्षक पंकज पिंपळे तसेच परीक्षक म्हणून हेमांगी पिसाट , हर्षद कडलख उपस्थित होते .
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने ‘ बालकोत्सव लोकनृत्य स्पर्धा ‘ आयोजित केली होती . कांदिवली पश्चिम येथील मनपा बजाज शाळेच्या सभागृहात दोनदिवसीय स्पर्धेत आर / दक्षिण विभागातील ८ शाळांनी सहभाग घेतला . बालकोत्सव लोकनृत्य स्पर्धेत शेतकरी नृत्य , टिपरी नृत्य , होजगिरी , गौर , डांगी , गेंदी , तारपा , नागा लोकनृत्य अप्रतिम सादर करण्यात आली . इयत्ता पहिली ते सातवीच्या विविध गटांतील , विद्यार्थ्यांनी केशभूषा , वेषभूषा आणि पारंपरिक पद्धतीवर भर दिला होता .
या स्पर्धेत अनुक्रमे चारकोप मराठी मनपा शाळा प्रथम क्रमांक ( देवी नृत्य ), गणेश नगर शाळा द्वितीय क्रमांक ( टिपरी नृत्य ) आणि समतानगर हिंदी शाळा तृतीय क्रमांक ( मारि अम्मा नृत्य ) पटकावले. श्रीमती छाया साखरे यांना उत्कृष्ट संगीत दिगदर्शिका या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केल्यामुळे शिक्षण विभागात सर्वानीच त्यांची स्तुती केली. विद्यार्थ्यांना ढोल – ताशांच्या व टाळ्यांचा गजरात पारितोषिक आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!