ताज्या घडामोडी

चरण येथे ३३ लाख ५० हजाराच्या विकास कामांचे भूमिपूजन.

Spread the love

प्रतिनिधी / चरण

(ता. शिराळा)येथे आमदार मानसिंगराव एक यांनी मंजूर केलेल्या सुमारे ३३ लाख ५० हजार रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन पार पडले. सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी मातंग समाज गल्लीत काँक्रीटीकरण करणे (४ लाख), कोळसे गल्ली व नगर गल्लीत आर. सी. सी. गटार बंधने (१५.४८ लाख), रामचंद्र नायकवडी यांच्या घरापासून कोळसे ताल पर्यंत सी. सी. गटार बंधने (४ लाख), जन सुविधा योजनेतून स्मशानभूमी कंपाउंड बंधने (१० लाख) या विकास कामांचे भूमिपूजन झाले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष विराज नाईक व माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विश्वास कारखान्याचे माजी संचालक रामचंद्र नायकवडी, जिल्हा बँक माजी संचालक एम. एस. कुंभार, पंचायत समिती उपसभापती बी. के. नायकवडी, कोंडीबा चौगुले, मोहन पाटील, पांडुरंग गायकवाड, विकास शिरसाट, बाबुराव नायकवडी, सर्जेराव नायकवडी, बाळू साळुंखे, दगडूचांद भाई, राष्ट्रवादी तालुका कार्यकारिणी सदस्य आलम नायकवडी, तसेच श्री गणेश ग्राम विकास मंडळ मुंबई चे सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!