ताज्या घडामोडी

आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल पोमाजी यांचा सांगवीत सत्कार

Spread the love

अक्कलकोट दि.
तालुक्यातील सांगवी बु ग्रुप ग्रामपंचायत मधील ग्रामसेविका शैलजा पोमाजी यांना सन २०१९-२० मध्ये महाराष्ट्र शासन , ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत दरवर्षी उल्लेखनीय कामकाजाबाबत प्रत्येक तालुक्यातील एक ग्रामसेवकास पुरस्काराने सन्मानित करण्यात येते , त्याच अनुषंगाने सन २०१९-२० मध्ये शिरवळवाडी येथील ग्रामसेविका शैलजा पोमाजी यांना हा पुरस्कार प्राप्त मिळाला असून, त्या पुरस्काराचे वितरण सोहळा दि १३ रोजी हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे पार पडला आहे.
पुरस्कार प्राप्त शैलजा पोमाजी ह्या सध्या सांगवी बु येथे कार्यरत असून, त्यांचा सांगवी बु ग्रामपंचायतीच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी, सरपंच वर्षा भोसले, पोलिस पाटील शुभांगी बाबर, माजी सरपंच अबूबकर शेख, उपसरपंच लक्ष्मण डांगे, मेजर बाळासाहेब भोसले , विष्णू भोसले,सदस्य मुन्ना शेख,प्रदिप सलबत्ते, रवी राठोड, इरफान शेख, जैनोद्दीन पठाण, राजू सलबत्ते, अंकुश घाटगे, चांद पठाण,आर भैरमडगी, ग्रामपंचायत कर्मचारी वसीम शेख, जावेद मुल्ला, राजू खरात, यातीराज भोसले, अंगणवाडी सेविका अर्चना कुलकर्णी, नसीमा शेख, माधुरी भोसले, यासह गावातील नागरीक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!