आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

तळेगाव दाभाडे: गोरगरिबांवर कारवाई, मात्र उच्चभ्रूंच्या वसाहतीत अनधिकृत बांधकामांना अभय?

मुख्याधिकारी यावर कारवाई आणि उपाय योजना करणार का???

Spread the love

तळेगाव दाभाडे: गोरगरिबांवर कारवाई, मात्र उच्चभ्रूंच्या वसाहतीत अनधिकृत बांधकामांना अभय?

आवाज न्यूज : राजेश बारणे तळेगाव दाभाडे, ३१ डिसेंबर.

संपूर्ण शहरात इमारतींमध्ये अनधिकृत झालेली बांधकामे ,हॉटेलच्या पार्कींगमध्ये झालेली अनधिकृत बांधकामे ,शहरातील सर्व भागात सरकारी व खाजगी जागेवरील अनधिकृत लोखंडी होर्डिंग्ज वर्षानुवर्षे दिमाखात उभी आहेत. अनेक बेकायदेशीर दूरसंचार विभागाचे टॉवर अनेक इमारतींवर उभे आहेत.

त्यांचे लाखोंनी मिळणारे उत्पन्न हे वाटून खात असताना त्यांना हात न लावता गोरगरिबांना मात्र अतिक्रमण विभागाचे कार्यक्षम अधिकारी तत्परता दाखवतात. अतिक्रमण वाहन आणि हा विभाग फक्त गरीब आणि वंचित घटकांवर कारवाई करण्यासाठी तत्पर असतो. धनदांडग्या नागरिकांची बांधकामे यांना अजिबात दिसत नाहीत. नोटिसा देणे आणि अर्थपूर्ण कानाडोळा करणे यातच यांचा कार्यकाळ जातो. मुख्याधिकारी यावर कारवाई आणि उपाय योजना करणार का???

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!