ताज्या घडामोडी

डोंबिवलीकर दर रविवारी राबविणार लोक सहभागातून स्वच्छता अभियान

Spread the love

डोंबिवली- कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या लोकसहभागातून स्वच्छता व नागरिक सुविधा अभियानांतर्गत पालिकेचे अधिकारी अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दर रविवारी आपापल्या परिसरात रहिवाशी,रोटरी क्लब डोंबिवली,पर्यावरण तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते,ज्येष्ठ नागरिक आदींच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे.

यासंदर्भात नुकतीच ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालय, निवासी विभाग, एमआयडीसी बस स्टॉप, डोंबिवली पूर्व येथे पालिका अधिकारी आणि रहिवाशांसह पालिका अधिकारी अतुल पाटील यांनी सर्व रस्ता व लगतच्या परिसराची पाहणी केली.
या पाहणीत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त कचरा टाकल्याने अस्वच्छ झालेला परिसर, रस्त्याची दुर्दशा, मानवी जीवितहानीस कारणीभूत व पडझड झालेली नाल्याची संरक्षक भिंत, रस्त्याच्या कडेला वीज खांबावरील नेहमीच बंद असणारी लाईट, रस्त्यावरील अनधिकृत स्टॉल आदी समस्या रहिवाशांनी मांडल्या.त्यानंतर पालिका अधिकारी अतुल पाटील यांनी लोकसहभागातून चळवळ उभारण्यासाठी मार्गदर्शन केले. याकरिता कडोंमनपा पूर्ण क्षमतेने काम करेल असे सांगितले. तसेच
रोटरी क्लब डोंबिवली पूर्वचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक विजय डुंबरे (इंडस कंपनी) यांनी याकामी व्यावसायिकांच्या सहकार्याचा एक हात नेहमीच पुढे राहील असे सांगितले.तर पर्यावरण तज्ञ विजय घोडेकर,पर्यावरण दक्षता समितीचे ललित शाईवाले आणि प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक बांधिलकी जपणारे अविनाश गरीबे यांनी यासाठी एक वर्षाचे नियोजन करून एक रोल मॉडेल बनविण्यासाठी सक्रिय सहकार्य करणार असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले.या अभियानात कडोंमनपा अधिकारी अनिकेत धोत्रे, शिंदे तसेच बहुसंख्येने निवासी विभाग – एमआयडीसी डोंबिवली परिसरातील सोसायटीचे रहिवाशी व पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक संघ सदस्य,
सामाजिक कार्यकर्त उपस्थित होते.यावेळी दर रविवारी एक तास रहिवाशांनी आपला परिसर स्वच्छ करण्यासाठी द्यावा व एकत्रित संघटित रहावे अशी मौलिक सूचना पालिका अधिकारी पाटील यांनी केली.यावेळी प्रास्तविक माधव हुले तर आभार अशोकराव खोपडे यांनी मांडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!