ताज्या घडामोडी

जनक्रांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने घेण्यात आला हळदी कुंकवाचा व खेळ गीतांचा नवोपक्रम घेऊन आशा वंचीत महिलांना दिला संक्रातीचा वान

Spread the love

या धावत्या जगामध्ये समाजामधील विधवा निराधार परित्यक्ता ज्येष्ठ महिलानमध्ये ऊर्जा व नवचेतना निर्माण करण्यासाठी जनक्रांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने घेण्यात आला हळदी कुंकवाचा व खेळ गीतांचा नवोपक्रम घेऊन आशा वंचीत महिलांना दिला संक्रातीचा वान व पाडला.

एक नवा पायंडा 4 फेब्रुवारी 2022 रोजी जनक्रांती बहुउद्देशी सेवाभावी संस्थेच्या वतीने ब्रम्हनाळ येथिल बिरोबा मंदिरामध्ये हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये जुन्या रूढी परंपरा जुगारून विधवा परित्यक्ता महिलांना देखील हळदी कुंकू आणि वाण देण्यात आले यामध्ये महिलांसाठी वेगवेगळे खेळ घेवून त्यांच्यामध्ये असणारे कला गूण अगदी हसत खेळत वृद्ध महिलांनी सुद्धा उस्फुर्तपणे या खेळांनमध्ये सहभाग नोंदवला त्याच बरोबर उखण्याची स्पर्धा घेण्यात आली यात महिलांचा सहभाग वाखान्या सारखा होता जणू या महिला अबला नाहि तर सबला वाटत हौत्या खूप आनंदात हा कार्यक्रम पार पडला फक्त चूल आणी मूल व चार भिंतिच्या आत राहणाऱ्या ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या हक्काच एक व्यासपीठ मिळावं त्या महिलांच्या अंगातिल कला गुणांना वाव मिळावा समाजातील रूढी परंपराचं ओझं घेऊन फिरणाऱ्या समाजातील या वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा कार्यक्रम जनक्रांती च्या अध्यक्षा माया गडदे पाटील यांनी ठरवून घेतला या कार्यक्रमाचे या कार्यक्रमाचे प्रास्थाविक जनक्रांतिच्या माया गडदे पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन अंजना कोळेकर यांनी करतच महिलांसाठीचे वेगवेगळ खेळ देखील घेतले जनक्रांती चे कार्याध्यक्ष आकाश पाटील यांनी ऊपस्थित महिलांचे आभार मानले.जनक्रांती च्या महिला कार्यकर्त्या किशोरी गुरव ,सुरेखा लोटे, लता गायकवाड, जयश्री हाबगुंडे ,सुनिता गडदे ,वर्षा गडदे यांनी कार्यक्रमाचे नियोजन जबाबदारी पूर्वक पार पाडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!