चिंचोलीच्या कुस्ती मैदानात दत्ता बानकर विजयी
कोकरूड/ वार्ताहर
चिंचोली (ता.शिराळा) येथील झालेल्या कुस्ती मैदानात.प्रथम क्रमांकाच्या कुस्ती लढतीत दत्ता बानकर (चिंचोली) यांने लक्ष्मण जाधव (इचलकरंजी) यांच्यावर सातव्या मिनिटाला पोकळ घिस्सा डावावर प्रेक्षणीय विजय मिळवला. द्वितीय क्रमांकाची कुस्ती लढत विकी थोरात (ओंड) व कर्तार कांबळे (कोल्हापुर) ही कुस्ती कर्तार जखमी झाल्याने बरोबरीत सोडविण्यात आली.तृतीय क्रमांकासाठी ओकांर जाधव (चिंचोली) यांनी पोकळ घिस्सा डावावर शहाजी फल्ले (इंचलकरंजी) याचेवर विजय मिळवला.चतुर्थ क्रमांकाची धैर्यशिल सकटे (चिंचोली) व रविंद्र पाटील (कोल्हापुर) ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. पाचव्या क्रमांकाची लढतीत पै.मयुर जाधव (चिंचोली) याने पै.प्रदिप पाटील (कणदुर) यांच्यावर प्रेक्षणीय विजय मिळवला. सहा नबंर साठी पै.अर्थव पाटील ( शेडगेवाडी) याने पांडुरंग कोळापटे (तुरुकवाडी) यांच्यावर विजय मिळविला.या मैदानात छोट्या मोठया अनेक चटकदार कुस्त्या पार पडल्या.
प्रारंभी कुस्ती मैदानाचे पुजन जेष्ठ पैलवान व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. मैदानाचे संयोजन सुरेश जाधव व दिनेश जाधव मित्र परिवार यांनी केले.या मैदानासाठी जिल्हा बॅकेचे संचालक सत्यजित देशमुख,भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष डी.आर. जाधव, माजी सभापती हणमंतराव पाटील,उपसभापती बाळासाहेब नायकवडी,नारायण जाधव (शेट) डाॅ. नंदकुमार पाटील, उप महाराष्ट्र केसरी संपतराव जाधव, आँलम्पिक वीर बंडा पाटील, हिंदुराव नांगरे,शिवाजी लाड,आनंदराव पाटील,तानाजी पाटील,दता आंदळकर,विकास शिरसट आदी प्रमुख उपस्थित होते. पंच म्हणुन कुस्ती कोच आनंद धुमाळ,वसंतराव पाटील,संदिप पाटील,तानाजी चवरे, आनंदा भोसले तर मैदानाचे समालोचन सुरेश जाधव यांनी केले