ताज्या घडामोडी

कुसुम गंध जिवन गौरव पुरस्कार हुबालवाडी गावच्या रहिवाशी सौ. मंगल प्रकाश कनप यांना प्रदान

Spread the love

बहे हायस्कूल बहे तालुका वाळवा येथे साप्ताहिक कुसुम गंध चे संपादक विजय हुबाले कुसुम राजाराम पाटील.याच्या नावाने सुरू करण्यात आलेला
कुसुम गंध जिवन गौरव पुरस्कार हुबालवाडी गावच्या रहिवाशी सौ. मंगल प्रकाश कनप हरहुन्नरी सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करणाऱ्या रंजल्या गाजलेल्या लोकांना सदैव मदतीचा हात देणार्या अनाथ निराधार बालकांना दत्तक घेऊन त्याचा शिक्षाणाचा भार उचलणाऱ्या आधुनिक काळातील सावित्रीबाई फुले म्हटले तर वावगे होणार नाही एक आदर्श गृहिणी ते सर्वसामान्य शिक्षिका,एक आदर्श मुख्याध्यापक ते एक आदर्श केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी, असा प्रवास करुन सेवानिवृत्त झालेल्या सौ.मंगल प्रकाश कणप (मॅडम) यांचा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.जयंतराव पाटील (साहेब) यांच्या हस्ते कुसुमगंध जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विजय पाटील सरचिटणीस बाळासाहेब पाटील शहाजी पाटील देवराज पाटील राष्ट्रवादीचे महिला जिल्हाध्यक्षा सौ. सुश्मिता जाधव सौ. रोजा किणीकर संभाजी कचरे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कनप संजय गांधी निराधार योजनाचे अध्यक्ष संजय पाटील संदीप माने आदी मान्यवर उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!