ताज्या घडामोडी

ग्रंथमित्र विष्णू माने सर यांचा सत्कार.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / तरुण मित्र मंडळ तालुका वाचनालय शिराळा, सांगली जिल्हा ग्रंथालय संघ, शिराळा तालुका ग्रंथालय व कर्मचारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शिराळा तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व ग्रंथमित्र श्री विष्णू माने सर वाकुर्डे बुद्रुक यांची राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सांगली जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगावर पुढील पाच वर्षासाठी मध्यस्थ म्हणून निवड झाली त्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी तरुण मित्र मंडळ वाचनालयाचे अध्यक्ष बाळकृष्ण हसबनीस, उपाध्यक्ष दिनेश सबनीस, जिल्हा ग्रंथालय संघाचे भोसले काका, घोरपडे सर, राज्य ग्रंथालय संघाचे पांडुरंग सुर्यवंशी तात्या, शिराळा तालुका ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष विश्वास पाटील, कार्यवाह कृष्णात केसरे, सचिन पाटील धावडे धनंजय माने बिंबवले, बाजीराव जाधव चिंचोली, उदय माने वाकुर्डे बुद्रुक, बाबासाहेब मिरूखे, सौ सुजाता माने, सौ आशा माने, मकरंद जोशी इत्यादी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. श्री माने सरांनी आपला जिवन पट उपस्थितांच्या समोर मांडला. कार्यकत्यांच्या पाठबळावर ग्रंथमित्र पुरस्कार मिळाला, आता ग्राहक मंचाकडे मध्यस्थ म्हणून नेमणूक झाली हे यश कार्यकत्यांचे आहे असे उद्गार माने सरांनी काढले. माझ्या सत्कारामुळे अधीक जोमाने काम करण्याची ऊर्मी मिळालेली आहे. यानंतर सातत्याने सामाजिक कार्यामध्ये काम करत रहाण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी माने सरांना शुभेच्छा देतांना बाजीराव जाधव चिंचोली घोरपडे सर आष्टा, पांडुरंग तात्या पलूस सांडगेवाडी, बाळकृष्ण सबनीस शिराळा यांनी मनोगते व्यक्त केली. सत्कार समितीचे अध्यक्ष श्री कृष्णात केसरे रेड यांनी माने सरांच्या कार्याची ओळख करून दिली तर सचिन पाटील धामवडे यांनी उपस्थितांचे आभार मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!