ताज्या घडामोडी

राज्यस्तरीय सक्षम दिव्यांग उद्योजक योध्दा पुरस्कार* राहुरी येथील शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांना जाहीर

Spread the love

सक्षम पोलिस टाईम्स नाशिक महाराष्ट्र राज्य यांचा राज्यस्तरीय *सक्षम दिव्यांग उद्योजक योध्दा पुरस्कार* राहुरी येथील शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांना जाहीर करण्यात आला असल्याचे सक्षम पोलिस टाईम्स चे संपादक श्रीयुत विलास पाटील यांनी पत्राद्वारे कळविले आहे. 11 दिव्यांग उद्योजकांना हा पुरस्कार महाराष्ट्रातील व्यक्तींना दिला जाणार आहे.
दि.१६ एप्रिल रोजी सायंकाळी ७ संभाजीमहाराज चौक उंटवाडी रोड नाशिक येथे एका समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
भारतभर इतर पुरस्कार खुप मिळाले पण हा पुरस्कार दिव्यांग उद्योजक म्हणून मिळत आहे म्हणजे खुप मोठी कौतुकाची थाप पाठीवर पडत आहे. कारण गेल्या ३२ वर्षांपासून १५ वर्षे शिवशाहीर व १५ वर्षे कीर्तनकार आणी यापुढे १५ वर्ष यशस्वी उद्योजक होउन इतरांना प्रेरणा मिळेल असे कार्य करून दाखवणार आहे. दि.११ जाने २०२१ रोजी उद्योगास सुरुवात केली. त्यामधे ऑनलाइन यशाचा नवा मंत्र शिवतंत्र हा कोर्स शिकवत आहेत. त्यातुन आणखी उद्योजक तयार होत आहेत. तसेच पोकलेन मशिनचाही व्यवसाय करुन स्वतः च्या कमाईतुन अनेकांना आर्थिक मदत करत आहेत. उद्योजक म्हणून हा पुरस्कार मला मिळाला याचा मनस्वी खुप आनंद होत आहे असे शिवशाहीर डॉ.विजय महाराज तनपुरे यांनी सांगितले.
शिवशाहीर डॉ विजय तनपुरे यांनी शाहिरीतून व कीर्तनातून शिवरायांचे कार्य महाराष्ट्रात देशात तसेच परदेशातही पोहोचवले आहे. तसेच सिन्नर येथे अंध अपंग निराधार इत्यादी समाजातील दुर्लक्षिलेल्या घटकांसाठी शिवाश्रमाची बांधणी करून लोकार्पण केले आहे. शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांचे आकाशवाणी दूरदर्शन तसेच इतर खाजगी वाहिन्यावर नेहमीच कार्यक्रम होत असतात. तरुणांसाठी त्यांनी ऑनलाइन यशाचा महामंत्र शिवतंत्र कोर्स ची निर्मिती केली आहे. शेकडो तरुण याचा फायदा घेत आहेत. छत्रपतींच्या चरित्रातून आजच्या तरुणांनी यशस्वी उद्योजक कसे व्हायचे हे या कोर्समध्ये शिकवले जाते. त्यांच्या वेबसाईट मुळे जगभरातील मराठी माणसांपर्यंत ही माहिती पोहोचली आहे. यापूर्वी शिवशाहीर विजय तनपुरे यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल दिल्ली विद्यापीठाने तीन वर्षांपूर्वी त्यांना मानद डॉक्टरेट ही पदवी देऊन सन्मान केला आहे. आपले गेले काय त्यापेक्षा आपल्याकडे काय शिल्लक आहे याचा विचार केला तर जीवनामध्ये यश निश्चितच मिळते असा मूलमंत्र ते तरुणांना सातत्याने देत असतात. राज्यस्तरीय सक्षम दिव्यांग उद्योजक योध्दा पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवशाहीर विजय तनपुरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!