मलकापूर येथील न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स येथे १५ ते १८ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणास प्रारंभ….
अशोक जाधव
शासनाच्या आदेशानुसार आज ३ जानेवारी पासून कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स, मलकापूर येथे ग्रामीण रुग्णालय, मलकापूर यांच्यावतीने १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलींना मलकापूर नगर परिषदेच्या आरोग्य सभापती स्नेहल शेंडे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कविता कदम आणि डॉक्टर स्मिता कांबळे. यांच्या प्रमुख उपस्थितीत कोव्हॅक्सिन लस देत लसीकरणास प्रारंभ झाला.
सन २००७ वा त्यापुर्वी जन्म वर्ष असलेल्या लाभार्थ्यांनाच लसीकरण करण्यात येणार आहे.
१५ ते १८ वयाच्या लाभार्थ्यांना कोविन सिस्टीमवर स्वतःच्या मोबाइल नंबरव्दारे लसीकरणासाठी नोंदणी करता येईल ही ऑनलाईन सुविधा १ जानेवारी पासून सुरू करण्यात आली आहे.
या वयोगटातील लाभार्थ्यांसाठी कोविड १९ वर्किंग ग्रुप ऑफ नॅशनल टेक्निकल अॅडव्हायइरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन यांनी केवळ ‘कोव्हॅक्सिन’ लस वापराबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आज दिवसभरात २२८ विद्यार्थ्यींनीना लसीकरण करण्यात आले. यासाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयाच्या कोमल कांबळे, जे.डी गुरुले, पायल आत्तार, सायली साळुंखे, एस. व्ही. पाटील, जया चिंचवाडकर आदी आरोग्य सेविका व सेवक यांनी परिश्रम घेतले. त्यांना सर्व शिक्षक स्टाफने शिस्तबद्ध लसीकरण पार पाडण्यास मदत केली.