ताज्या घडामोडी

फुले एज्युकेशन तर्फे सामजिक न्याय भवन च्या 90 व्या वर्धापनदिनी समाज कल्याण ऑफिस सन्मानित

Spread the love

पुणे/विश्रांतवाडी –
सामाजिक न्याय विभाग स्थापना दिनाच्या 90 व्या वर्धापन दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन विश्रांतवाडी पुणे येथे
समाज कल्याण ऑफिसचा सत्यशोधक समाज शताब्दी सुवर्णमहोत्सवी वर्ष आणि नामदार छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस निर्भय दिनानिमित्त प्रादेशिक उपायुक्त सामाजिक न्याय व विशेष सहा. विभाग मा श्री बाळासाहेब सोळंकी सर यांना थोर समाजसुधारक महात्मा फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची फोटो फ्रेम अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांच्या शुभहस्ते तसेच फुले दाम्पत्य व ऐतिहासिक शूर महिला मराठी, हिंदी,इंग्रजी व जर्मन भाषेतील ग्रंथ भेट देऊन सन्मान केला व 90 व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विशेष समाजकल्याण अधिकारी श्री. मल्लिकानाथ हरसुळे,
समाज कल्याण निरीक्षक श्री. आल्हाट , सहाय्यक लेखाधिकारी श्री. इंदल चव्हाण , अर्चना होले ,सौ.जयश्री भुराने मॅडम, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस श्री सुयश राऊत , सत्यशोधिका आशा ढोक व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रादेशिक उपायुक्त सोळंकी म्हणाले की आम्ही सर्व अधिकारी फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने नेहमी विद्यार्थी हित पाहूनच कार्य करीत असतो . आजच्या 90 व्या वर्धापन दिनी आपण सर्वजण हे सामजिक वर्ष म्हणून विविध कार्यक्रमाने साजरे करून सामाजिक एकात्मकता पाळत आपल्या संविधानाचा सन्मान कायम करू या असे विचार व्यक्त केले.
याप्रसंगी सत्यशोधक ढोक म्हणाले की समाजकल्याण ऑफीसच्या माध्यमातून शिष्यवृत्ती वाटप होते परंतु इबीसी प्रमाणे ज्यात्या वर्षीच शिष्यवृत्ती वाटप होईल असा प्रयत्न करून कॉलेज व विद्यार्थी हीत जोपासावे अशी विंनती करीत ओबीसी विद्यार्थ्यांना देखील इतरांप्रमाणे निवास निर्वाह भत्ता मिळावा अशी मागणी केली.
आभार सुयश राऊत यांनी मानले तर मोलाचे सहकार्य सौ.अर्चना होले,उदय ढोक यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!