ताज्या घडामोडी

नूतन मराठी शाळा नंबर 3 वाघाचा आखाडा येथील शाळेस गावातील नागरिकांकडून विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट टीव्ही भेट

Spread the love

(राहुरी प्रतिनिधी अक्षय करपे)राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा येथील राहुरी नगरपालिका शिक्षण मंडळ नूतन मराठी शाळा नंबर ३ या शाळेला गावातील सर्व मिळून दानशूर व्यक्तींनी विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी पुढाकार घेऊन शताब्दी महोत्सव निमित्त नूतन मराठी शाळा नंबर 3 या शाळेस विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट टीव्ही दिला आहे. वाघाचा आखाडा येथील सुजित तनपुरे गणेश वाघ गौरव तनपुरे गणेश बुचुडे राहुल तारडे सचिन धसाळ अजय वरखडे प्रमोद पटारे सुशांत सप्रे विजय पटारे आकाश सप्रे सोमनाथ तनपुरे सचिन गाडे अजित पटारे संकेत तनपुरे दीपक रायकर या सर्वांनी मिळून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेऊन शाळेच्या विद्यार्थ्यांना स्मार्ट टीव्ही उपलब्ध करून दिला आहे. अशाप्रकारे गावातील दानशूर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी त्यांना अद्यावत डिजिटल शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व गावातील नागरिकांनी या सर्वांचे कौतुक करून आभार मानले आहे. या सर्व तरुणांनी इतर भागातील लोकांना आवाहन केले आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी फुल न फुलाची पाकळी देऊन पुढे येऊन मदत केली पाहिजे अशी भावना दानशूरनी यावेळी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!