ताज्या घडामोडी

बोरीवली पूर्व मधील कुलूपवाडी मार्गाचे अहिल्याबाई होळकर मार्ग नामकरण सोहळा संपन्न.

Spread the love

भारत कवितके मुंबई
रविवार दिनांक १३ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजता बोरीवली शिवसेना शाखा क्रमांक १२,नगरसेविका सौ.गीता संजय सिंघण यांच्या अथक प्रयत्नांनी बोरीवली कुलूपवाडी मार्गाचे अहिल्याबाईं होळकर मार्ग असे नामकरण शिवसेना सचिव,खासदार विनायक राऊत यांचे शुभ हस्ते करण्यांत आले. या विभागातील धनगर समाजाची अनेक वर्षांपासून ही नामकरणाची मागणी आता पूर्ण झाल्याने व लवकरच या धनगर समाज बांधवा करीता समाज कल्याण केंद्र बांधण्याची मागणी पूर्ण होणार असल्याचे नगरसेविका सौ.गीता संजय सिंघण यांनी सांगितल्यामुळे धनगर समाज बांधवांनी समाधान व्यक्त केले.या प्रसंगी गोवर्धन सभागृहात नगरसेविका सौ. गीता संजय सिंघण यांच्या विशेष निधीतून गरिब, गरजू महिलांना मोफत शिलाई मशिनचे वाटप,व स्वखर्चाने मोफत एल.ई.डी.दिवे वाटप करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते,सह धनगर समाजातील सचिन भास्कर,सिध्देश होनमाने,बापु वायकुळे,भारत नाईकवाडे,भिमराव लवटे,शरद सुसलादे,मुकिंद वाघमोडे,आणि धनगर समाजाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, साहित्यिक भारत कवितके सह अनेक धनगर समाज बांधव उपस्थित होते
भारत कवितके, मुंबई मोबाईल ८६५२३०५७००

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!