ताज्या घडामोडी

वाकूर्डे उपसा जलसिंचन योजनेसाठी केंद्र सरकार कडून ५६२ कोटी रुपये निधी मंजुरी – सत्यजित देशमुख.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी :-

शिराळा व वाळवा तालुक्याला वरदान ठरणाऱ्या वाकूर्डे उपसा जलसिंचन योजनेसाठी केंद्र सरकारकडून नाबार्ड आर.आय.डी.एफ मधून ५६२ कोटी रुपये निधीला मंजूरी मिळाली आहे.अशी माहिती सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांनी दिली.

यावेळी बोलताना सत्यजित देशमुख म्हणाले :- वाकुर्डे बुद्रुक योजना शिराळा व वाळवा तालुक्यासाठी वरदान ठरणारी असून या योजनेच्या माध्यमातून भाग एक व भाग दोन मधून २८हजार ३५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या योजने चे सध्या भाग एक मधील टप्पा एक, दोन व तीन मधील अपूर्ण असणारी कामे पूर्णत्वास आणण्या चे काम चालू आहे. या योजने मधून कापरी,इंगरुळ, रेठरे धरण,खेड,भटवाडी या शिवारामध्ये पाणी आलेले आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८० कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी निधीची तरतूद केली आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने खास बाब म्हणून वाकुर्डे बुद्रुक योजनेसाठी ५६२ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केंद्र सरकारकडे नाबार्ड योजने मार्फत केली होती. या मागणीला केंद्र सरकारकडून न्याय मिळाला असून केंद्राने ५६२ कोटी रुपये इतका निधी मंजूर केला आहे.या योजनेत केंद्र सरकार ने दोनच योजना घेतल्या आहेत.यामध्ये वाकुर्डे ५६२कोटी व गडचिरोली जिल्हयातील टाकोळी मोकाशा योजनेला ११९कोटी इतका निधी मंजूर झाला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी या मंजुरीसाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल शिराळा व वाळवा तालुक्याच्या जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानतो.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी वाकुर्डे बुद्रुक योजनेसाठी निधी ची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. या मागणी नुसार केंद्र सरकार ने निधी मंजूर केला आहे.यामध्ये एकूण चार टप्प्यांमध्ये हा निधी उपलब्ध होणार असून वाकुर्डे बुद्रुक योजने ची उर्वरित सर्व कामे यामुळे मार्गी लागण्यास मदत होईल. याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!