ताज्या घडामोडी

पिंपरी चिंचवड महापालिकेचा ८ हजार ६७६ कोटी ८० लाख रूपयांचा अर्थसंकल्प सादर

आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही करवाढ, दरवाढ करण्यात आलेली नाही.

Spread the love

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प आज २० फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आला. २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा मूळ ५ हजार ८४१ कोटी ९६ लाख रूपये आणि केंद्र व राज्य शासनाच्या पुरस्कृत योजनांसह ८ हजार ६७६ कोटी ८० लाख रूपयांचा हा अर्थसंकल्प आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही करवाढ अथवा दरवाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही.

विशेष अंदाजपत्रकीय सभेमध्ये महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना अर्थसंकल्प सादर केला.पालिकेचा हा ४२ वा अर्थसंकल्प असून आयुक्त शेखर सिंह यांच्या कार्यकालातील दुसरा अर्थसंकल्प आहे. आयुक्त्तांनी प्रशासक या नात्याने त्याला मान्यता दिली आहे.

या सभेस यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप उपस्थित होते.

अर्थसंकल्पात काय आहे?

  • महापालिकेच्या विकास कामासाठी १८६३ कोटी तरतूद
  • आठ क्षेत्रीय कार्यालयासाठी १९० कोटी
  • महिलांच्या विविध योजनांसाठी ६१ कोटी ५८ लाख
  • दिव्यांग कल्याकणारी योजना ६५ कोटी २१ लाख
  • भूसंपादनकरिता १०० कोटी
  • शहरी गरिबांसाठी १८९८ कोटी
  • पाणीपुरवठा २६९ कोटी ८९ लाख
  • पीएमपीएमएलसाठी २६९ कोटी ८९ लाख
  • स्मार्ट सिटीसाठी ५० कोटी रुपये तरतूद
  • स्थापत्य विशेष योजनांसाठी १०३१ कोटी ७९ लाख

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!