ताज्या घडामोडी

जायन्ट्स ग्रुप ऑफ शिराळा हिरकणी व पंचायत समिती शिक्षण विभाग यांचे मार्फत ‘आजादी का अमृत महोत्सव’ या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा आयोजन

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / न्यू इंग्लिश स्कुल शिराळा येथे तालुका स्तरीय आझादी का अमृत महोत्सव यानिमित्ताने लहान गट,व मोठा गटअशा दोन विभागात राष्ट्रीय एकात्मता या अंतर्गत येणारे विषय घेऊन स्पर्धा आयोजित केली होती. तालुक्यातील ४० शाळांनी सहभाग घेतला होता. व्यसनमुक्ती, पर्यावरण, माझा देश, मोबाईल चे दुष्परिणाम, प्लॅस्टिक मुक्ती असे विषय घेतले., गट विकासअधिकारी राऊत सर,गटशिक्षणाधिकारी प्रदिप कुडाळकर, विस्तार अधिकारी बाजीराव देशमुख व माजगावकर सर यांनी स्पर्धा चे उत्तम नियोजन केले होते.आमच्या जायंट्स ग्रुप च्या अध्यक्षा सविता नलावडे मॅडम, नेत्र चिकित्सा अधीकारी, उपाध्यक्ष डॉ मनीषा यादव, मॅडम खजिनदार नुतन साठे मॅडम, सह खजिनदार सरोजिनी कदम मॅडम, जनसंपर्क अधिकारी प्रा. शैलजा काकडे,संचालिका निलोफर मुल्ला, गौरी साळुंखे, रेश्मा पवार यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी योगदान दिले. शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते,स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न होणार आहे याची यशस्वी स्पर्धकांनी नोंद घ्यावी असे संयोजकांनी आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!