आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलित– नर्सिंग स्कूलचा बालविसावा लॅम्प लाइटिंग आणि शपथविधी समारंभ अत्यंत दिमाखात प्रसन्न वातावरणात संपन्न झाला!

Spread the love

तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलित– नर्सिंग स्कूलचा बालविसावा लॅम्प लाइटिंग आणि शपथविधी समारंभ अत्यंत दिमाखात प्रसन्न वातावरणात संपन्न झाला!

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे प्रतिनिधी, ६ जानेवारी.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते संस्थेचे अध्यक्ष.गणेश खांडगे,! प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलनानंतर प्राचार्य मोनालिसा मॅडमने सर्वांच स्वागत आणि प्रास्ताविक केलं! आमच्या स्कूलचा प्रत्येक विद्यार्थी हा रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा समजून निश्चितच कार्यरत राहील असं अध्यक्ष.गणेश खांडगेनी अभिवचन सर्व उपस्थित पालकांना आपल्या मनोगतात व्यक्त केले. नरसिंग क्षेत्रातील अनुभव संपन्न प्रमुखपाहुणे  दत्तात्रय करडिलेसरांनी रुग्णसेवा करीत असतानाच प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास प्रयत्नपूर्वक जोपासावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

चेअरमन शैलेशभाई शहानी परिचारिकांनी रुग्णांशी संवाद साधताना त्यांचा आत्मविश्वास कसा वाढवावा याच्या सुरेख टिप्स विद्यार्थ्यांना दिल्या ! आय एम एच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे प्रयत्न डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांनी करावी ही अपेक्षा शैलेश भाईंनी आपल्या मनोगतात व्यक्त केली. अप्पदिपो भव-_ तू स्वतः दीप हो याच भावनेने विधिवत प्रार्थना आणि शपथविधी संपल्यानंतर या सर्वांनी आपली मनोगत व्यक्त केली.

नर्सिंग स्कूलचे पालकमंत्री डॉ शालिग्राम भंडारींनी आपल्या समारोपाच्या भाषणात विविध दृष्टांत काव्यपंक्ती आणि शेरोशायरी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांसह पालकांनाही प्रोत्साहित केले! विद्यार्थ्यांतर्फे प्रफुल्ल लोंढे- दिव्या केदारी आणि पालकांतर्फे पालकांतर्फे प्रवीण लोंढे यांनी मनोगत व्यक्त केले! प्रतीक्षा बालगुडे आणि शुभांगी कदम यांनी उत्तम सूत्रसंचालन केले! क्रिस्टिना रणभिसे मॅडमने सर्वांचे आभार मानले. पसायदानाने समारंभाची सांगता झाली!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!