ताज्या घडामोडी

देवराष्ट्रेचे युवा चित्रकार रविंद्र शिंदे यांच्या चित्र व शिल्पकलेतून निखळ आनंद निर्माण होतो : ना.जयंतराव पाटील

Spread the love

कोकरुड/ वार्ताहर
देवराष्ट्रेचे युवा चित्रकार रविंद्र शिंदे यांच्या चित्र व शिल्पकलेतून निखळ आनंद निर्माण होतो असे प्रतिपादन मंत्री जयंतराव पाटील यांनी केले. ते देवराष्ट्रे तालुका वाळवा येथील युवा चित्रकार रवींद्र शिंदे यांच्या ‘प्रगल्भ’ आर्ट गॅलरीच्या भेटी प्रसंगी बोलत होते यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक ॲड. बी. एस. पाटील ,सौ. अरुणादेवी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी राज्याचे जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांनी प्रगल्भ आर्ट गॅलरी मध्ये युवा चित्रकार रविंद्र शिंदे यांनी साकारलेल्या टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ , आकर्षक वस्तु तसेच समुद्र किनाऱ्यावरील शंख शिंपले पासून बनवलेले गणपती,उंट, घोडे,हत्ती ,नंदी अश्या अनेक शिल्पे कृती पाहिल्या.यावेळी ते पुढे म्हणाले की, चित्रकार रविंद्र शिंदे यांनी साकारलेली निसर्ग चित्रे कलाप्रेमींना भुरळ घालणारी आहेत. अत्यंत कलात्मक पद्धतीने, चित्र तसेच शिल्पकलेतील बारकावे टिपले आहेत. त्यांच्या कलादालनाने या क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना ऊर्जा, प्रेरणा निश्चितच मिळेल. कलाप्रेमींना ही गॅलरी पाहील्यानंतर निखळ आनंद निर्माण होईल. यावेळी देवराष्ट्रे गावातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!