ताज्या घडामोडी

कोकण विभागीय शिक्षक सेना अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा झंझावाती पालघर मध्ये प्रचार दौरा संपन्न!

Spread the love

प्रतिनिधी-लक्ष्मण राजे

पालघर :- तरुण तडफदार शिक्षकप्रिय उमेदवार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षकांशी संवाद साधण्यासाठ बुधवार दिनांक 24 ऑगस्ट 2022 रोजी सफाळे-पालघर दौरा केला. यामध्ये सफाळे, माकणे, विराथन, आगरवाडी, एडवण, केळवे, माहीम, पालघर मधील विविध माध्यमिक शाळांतील शिक्षकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या समजून घेतल्या व जिल्हा परिषद अध्यक्षा मा. वैदेही वाढाण तसेच शिक्षण विभागाला भेट देऊन मा. संगीता भागवत यांच्याशी संवाद साधून समस्यांचे निराकरण केले. तसेच वर्षातल्या 365 दिवशी शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पुढाकार घेणाऱ्या ज्ञानेश्वर म्हात्रे याच्यां विजयासाठी प्रयत्न करणार सांगत शिक्षकांचा आमदार शिक्षक असला पाहिजे याकरिता सर्व शिक्षकांनी मा. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या.या दौऱ्यामध्ये पालघर जिल्हा माध्यमिक शिक्षक सेनेचे अध्यक्ष संजय पाटील (शहरी), अध्यक्ष -विठ्ठल गोरे (ग्रामीण), उपाध्यक्ष विलास पाटील, उपाध्यक्ष रवींद्र नाईक, महिला आघाडी अध्यक्ष रोशनी गावड, कास्ट्राईब संघटनेचे कार्यध्यक्ष रवींद्र पालवे, मुख्याध्यापक संघ उपाध्यक्ष पंढरीनाथ देशमुख, सचिव प्रवीण चिमणकर, सचिव जतिन कदम, पालघर तालुका शिक्षक सेनेचे अध्यक्ष निलेश भोईर, सचिव प्रीतम घरत, कोषाध्यक्ष हरेश्वर नाईक, बोईसर विभाग शिक्षक सेनेचे अध्यक्ष नरेंद्र घरत, सचिव आशिष पाटील आदी जिल्हा व तालुका पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!