आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

 “गर्जा महाराष्ट्र माझा”  च्या गजरात, कृष्णराव भेगडे स्कूलने साजरी केली शिवजयंती.

तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित , कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात आज छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी..

Spread the love

 “गर्जा महाराष्ट्र माझा”  च्या गजरात, कृष्णराव भेगडे स्कूलने साजरी केली शिवजयंती.

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे , रविवार दि.१९ फेब्रुवारी.

तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित , कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात आज छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक. चंद्रकांत काकडे, संस्थेचे अध्यक्ष. संदीप काकडे , संस्थेच्या खजिनदार. गौरी काकडे , शाळेचे खजिनदार.अनिल तानकर , शाळेच्या मुख्याध्यापिका. मीना अय्यर इ.मान्यवर उपस्थित होते.

आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आलेल्या सर्वच पाहुण्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला. कार्यक्रमात. गौरी काकडे यांनी सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या तसेच.ज्योती नवले व धनश्री देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करून शिवाजी महाराजांच्या इतिहासाला उजाळा दिला. विद्यार्थी मनोगतात तेजस्विनी पारगे हिने शिवरायांना स्मरण केले. अतिशय सुंदर अशा बहारदार नृत्याने विद्यार्थिनींनी शिवाजी महाराजांचा पाळणा गायला. तसेच निकिता खारगे या विद्यार्थिनीने आपल्या गाण्यातून शिवरायांना अभिवादन केले.

 

त्याचबरोबर शाळेतील सर्व इतिहास विषय शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. यानंतर पालखी सोहळ्यात आलेले सर्व विद्यार्थी , पालक व शिक्षक वृंद सामील झाले. ढोल- ताशे , लेझीम, झांज इत्यादींच्या गजरात ही मिरवणूक निघाली. शाळेपासून निघालेली ही मिरवणूक आनंद नगर, वनश्रीनगर, मोहन नगर व मनोहर नगर परिसरात या तालवाद्यांच्या गजरात व छत्रपती शिवाजी महाराज की जय , हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी, अशा विविध घोषणा देत उत्साहात पुन्हा शाळेत पोहोचली.

वेगवेगळ्या घोषणांच्या गर्जनेतून सर्व परिसर दुमदुमला होता. सळसळत्या रक्तातून शिवाजी महाराजांचा इतिहास पुन्हा जागा होत होता. विविध वेशभूषा परिधान करून आलेले सर्वच विद्यार्थी अतिशय देखणे दिसत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.पुष्पलता व्यवहारे यांनी केले यानंतर सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!