ताज्या घडामोडी

जनजागृती सेवा समितीने महाराष्ट्रातील शिक्षक बंधु-भगिनींना ऑनलाईन पद्धतीने “आकर्षक ई सन्मानपत्र “देऊन साजरा केला शिक्षकदिन

Spread the love

बदलापूर(गुरुनाथ तिरपणकर)-भारतीय तत्वज्ञ,भारताचे दुसरे राष्ट्रपती डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांना विनम्र अभिवादन!शिक्षण क्षेत्रात क्रांती करणा-या डाॅ.राधाकृष्ण यांच्या जयंती निमित्त ज्ञानाच्या प्रकाशाने देशाला प्रगती प्रगतीपथावर नेणा-या महाराष्ट्रातील प्राथमिक,माध्यमिक,महाविद्यालयीन शिक्षक बंधु-भगिनींना “शिक्षकदिनाच्या”हार्दिक शुभेच्छा!याच शिक्षकदिनाचे औचित्य साधून जनजागृती सेवा समिती,महाराष्ट्र या सामाजिक संस्थेने महाराष्ट्रतील आदर्श शिक्षक बंधु-भगिनींना “ई सन्मानपत्र”पाठवुन सन्मानित केले.महाराष्ट्रातुन मुंबई शहर,उपनगर,कल्याण,कर्जत,ठाणे,डोंबिवली,अंबरनाथ,रायगड,सिंधुदुर्ग,रत्नागिरी,पालघर,विक्रमगड,सोलापूर,कोल्हापुर,जळगाव,धुळे,सांगोला,पुणे,सातारा,शिंदखेडा,कराड अशा विविध जिल्ह्यातील ठिकाणांहून सहभाग नोंदविला होता. त्यांना ऑनलाईन पद्धतीने”सन्मानपत्र”पाठविण्यात आली.जनजागृती सेवा समितीच्या वतीने संस्थेच्या सर्व पदाधिका-यांनी शिक्षक बंधु-भगिनींचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.हा ऑनलाईन उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे खजिनदार दत्ता कडुलकर,सचिव सौ.संचिता भंडारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!