ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी सदैव लढणारी संघटना म्हणजे अभाविप.. प्रदेश संघटन मंत्री गौरी पवार

Spread the love

शिराळा- वाळवा तालुक्यातील कार्यकारणी जाहिर……
शिराळा प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या विविध हक्कासाठी व समस्यासाठी सदैव लढणारी एकमेव विद्यार्थी संघटना म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद होय. असे प्रतिपादन अभाविपच्या प्रदेश संघटन मंत्री गौरी पवार यानी शिराळा येथे केले. परिषदेच्या विविध महाविद्यालयात कार्यकारणी जाहिर करण्यात आल्या त्या वेळी त्या बोलत होत्या. यावेळी कराड जिल्हा संपर्क प्रमुख श्रेयस महाजन व पदाधिकारी उपस्थित होते.
मातोश्री हिरवाई देशमुख नर्सिंग इन्सिट्युट येथे बोलताना जिल्हा संपर्क प्रमुख श्रेयस महाजन यानी अभाविपचा इतिहास, कार्य आणि भविष्यकालीन वाटचाल याबाबत सविस्तर विवेचन केले. ते म्हणाले की हि जगतातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना असुन ज्ञान,शील आणि एकता या त्रिसूत्रीला प्राधान्य देऊन काम केले जाते. पदाधिकार्यानी काम करताना याचा विचार करून वाटचाल करण्याचे आवाहन केले. यावेळी गौरी पवार यानी या संस्थेतील कार्यकारणी जाहिर केली ती पुढील प्रमाणे महाविद्यालय अध्यक्ष रूपेश चौगुले,उपाध्यक्ष धनराज माने, तन्वी परब सेवार्थ विद्यार्थी प्रमुख योजना पांचाल, सहप्रमुख अदिका भालेकर, चैतन्य खोत सोशल मिडीया प्रमुख योगेश जयसिंगपुरे,अभ्यास मंडळ प्रमुख श्रुती पाटील सहप्रमुख माधव उगाळे,माधुरी कांबळे मेडीकल कॅम्प कोॲाडिनेटर स्वप्नील पवार. विश्वासराव नाईक महाविद्यालय विवेकानंद सेवा समिती महाविद्यालयीन प्रमुख हर्षद मुळीक सहप्रमुख साहिल पाटील,सुहास दंडवते संपर्क प्रमुख जयकुमार पाटील सदस्य दिग्विजय पाटील, साहिल चौगुले, सुधीर चव्हाण, गौरव केसरकर,गुरू पाटील, सोहम पायमल, यश पवार या प्रमाणे असुन तालुका संयोजक सुजीत पाटील, सह संयोजक आदिनाथ सुतार यानी नियोजन केले. लोकनेते राजाराम बापू पाटील आयुर्वेदीक मेडीकल कॅालेज एल. आर.पी. जिज्ञासा संयोजक अर्जुन राऊत, सहसंयोजक शशांक आडे,अर्थव पाटील, महाविद्यालय प्रमुख गीता घाडगे, सहप्रमुख गुंडाप्पा बिराजदार, विकासार्थ विद्यार्थी प्रमुख प्रतिक्षा कुंभेकर, सेवार्थ विद्यार्थी प्रमुख वैष्णवी डावकर, अभ्यास मंडळ प्रमुख प्रियांका शिंदे, सहप्रमुख कृष्णा पवार त्याच प्रमाणे ईश्वरपूर शहर कार्यकारणी पुढील प्रमाणे शहर मंत्री पवन जोशी, सहमंत्री अभिनंदन कोळेकर, सहमंत्री संकेत सपकाळ, शहर संपर्क प्रमुख नवनाथ बजबळकर, सहप्रमुख सुहास करांडे, विकासार्थ विद्यार्थी प्रमुख जावयांनी कुटे, सदस्य चैतन्य ऊबारे,आदेश कोळेकर या प्रमाणे कार्यकारणी जाहीर करण्यात आल्या. प्रदेश अध्यक्ष प्रा. निर्भय विस्पुते यानी सर्वांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!