ताज्या घडामोडी

शेख नौशिन सिराज यांना एमबीबीएस साठी प्रवेश मिळाल्याबद्दल उपविभागीय अधिकारी श्री शरद झाडके यांनी केले शेख नौशिन सिराज यांचा विशेष सत्कार

Spread the love

अंबाजोगाई दि.15 ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध वृतपत्रलेखक शेख सिराज यांची कन्या कु. शेख नौशिन सिराज यांना एमबीबीएस साठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , जळगाव या ठिकाणी प्रवेश मिळाल्याबद्दल अंबाजोगाई येथील उपविभागीय दंडाधिकारी मा.. श्री. शरद झाडके यांनी शेख नौशिन सिराज यांचा बुकेहार , देऊन विशेष सत्कार केला . सदरील सत्काराचा कार्यक्रम उपविभागीय कार्यालय अंबाजोगाई या ठिकाणी दि .15 फेबुवारी 2022 रोजी संपन्न झाला यावेळी अंबाजोगाईचे तहसिलदार मा.डॉ. विपीन पाटील , नायब तहसिलदार मा. श्रीमती स्मिता बाहेती मॅडम तसेच , शेख नौशिनचे वडील शेख सिराज यांच्यासह कार्यालयातील सर्व कर्मचारी आदि उपस्थित होते. यावेळी शेख नौशिन सिराज हीच्या घवघवीत यशाबद्दल मान्यवरांनी विशेष अभिनंदन केले . यावेळी उपविभागीय कार्यालयातील सर्व कर्मचारी, अधिकारी आTदि उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार शेख सिराज यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!