क्रीडा व मनोरंजन

खालगाव बीटच्या हिवाळी क्रीडा स्पर्धा उद्यापासून पासून चाफे येथे रंगणार-रोहित मयेकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Spread the love

जाकादेवी/संतोष पवार.
रत्नागिरी तालुक्यातील खालगाव बीट स्तरीय हिवाळी सांघिक व मैदानी क्रीडा स्पर्धा गुरुवार दिनांक १२ जानेवारी पासून चाफे येथील मोहिनी मुरारी मयेकर महाविद्यालयाच्या भव्य पटांगणात होणार आहेत.
या क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन समारंभ रत्नागिरी पंचायत समिती शिक्षण विभाग व प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत होणार आहे सकाळी ९ वाजता होणार आहे.खालगाव बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी सौ.सशाली मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धा होणार आहेत.
यावेळी प्रमुख अतिथी मोहिनी मुरारी मयेकर शिक्षण संस्थेचे सचिव, मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक , युवा नेते रोहित मयेकर , मयेकर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. स्नेहा पालये उपस्थित राहणार आहेत.
सलग दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत खालगाव बीट प्राथमिक शाळांतील खेळाडूंचे विविध खेळ पाहण्याची चांगली संधी परिसरातील क्रीडाप्रेमींना उपलब्ध झाली आहे.
‌या हिवाळी क्रीडा स्पर्धेत सांघिक खेळ व मैदानी खेळांचा समावेश आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तरवळ-ओरी केंद्राचे केंद्रप्रमुख प्रकाश कळंबटे,बोंडेये केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख सुरेश घाणेकर,धामणसे केंद्राचे केंद्रप्रमुख पुरुषोत्तम केळकर, आगरनरळ केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख राजीव दर्डी, खालगाव बीट मुख्याध्यापक के. डी.वळवी यांसह खालगाव बीटमधील सर्व शिक्षक मेहनत घेत आहेत. या स्पर्धेमध्ये कबड्डी,खो-खो, लंगडी सांघिक खेळ तर लांब उडी ,उंच उडी,गोळाफेक, थाळी फेक, ५० मी. धावणे,१०० मी. धावणे असे मैदानी खेळांचा समावेश आहे. केंद्र स्तरावर विजयी संघ या बीट स्तरावरील स्पर्धेत आपले कौशल्य प्रदर्शित करणार आहेत.हा स्पर्धेचा क्रीडा महोत्सव दोन दिवस रंगणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!