ताज्या घडामोडी

युथ फॉर नेशन महाराष्ट्र प्रभागाचे महामहीम राज्यपाल यांच्या हस्ते लोकार्पण!

Spread the love

युथ फॉर नेशन या तरुणांसाठी कार्यरत राष्ट्रीय संघटनेचे असाम हरियाणा राज्य प्रभाग लोकार्पण पश्चात महाराष्ट्र प्रभागाचे महामहीम राज्यपाल श्री भगतसिंग कोषियारी यांच्या हस्ते नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीदिनी सोमय्या कॉलेज, विद्याविहार, मुंबई येथे लोकार्पण करण्यात आले. तरुणांना युवक अवस्थेत योग्य मार्गदर्शन प्राप्त होऊन, तरुणांमधील ऊर्जा राष्ट्राच्या प्रगतीसाठी कार्यरत व्हावी यासाठी सदर संस्था प्रभावीपणे कार्यरत राहील असे प्रतिपादन संस्थेचे मुख्य राष्ट्रीय समन्वयक श्री जी एस मूर्ती यांनी स्वागत भाषणात केले. देशाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर युवकांची साथ आवश्यक आहे असे मत महामहीम राज्यपाल श्री भगतसिंग कोशीयारी यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. सोमय्या कॉलेजचे अध्यक्ष श्री समीर सोमय्या, लेफ्ट कर्नल श्री वि के चतुर्वेदी, विविध संस्था संलग्न कोलोनल ललित कुमार बोरह, कर्नल श्री ज्ञानेंद्र सिंग, व्हिजन संस्था विश्वस्त श्री स्वप्निल वाडेकर, महिका संस्था श्री प्रदीप वजीर, एवं विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या सोहळ्यात आपली उपस्थिती दर्शविली. मधूस्मिता भट्टाचार्य यांच्या सुरेल स्वरांनी देश समर्पित गितगायन पश्चात्त सोहळा सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!