ताज्या घडामोडी

प्रस्थापित राजकीय पक्षांच्या भांडणात शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झीरो लोडशेडिंग तात्काळ बंद करा अन्यथा स्वाभिमानीचा आंदोलनाचा इशारा डॉ विवेक सोनवणे

Spread the love

फिरोज तडवी
जिल्ह्यात केळी पीक हे मोठ्या प्रमाणावर घेतले जात असून सद्य स्थितीत केळी कापणीवर आलेली असून झिरो लोडशेडिंगमुळे कमी पाणीपुरवठा अभावी केळीचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे.
मुक्ताईनगर प्रतिनिधी, कैलास कोळी
केळीसाठी कमि पाणीपुरवठा हा केळी पिकाचे उत्पादन क्षमतेवर परिणाम करणारा आहे. सद्यस्थितीत तापमान हे ४५ डिग्री सेल्सियसच्या जवळपास आहे त्यामुळे या केळी पिकाला रोजच पाण्याची आवश्यकता आहे त्या केळी पिकाला एक दिवसाचा जरी पाण्याचा खंड पडला तरी त्याच्या उत्पादन क्षमतेवर तात्काळ परिणाम दिसून येत आहेत.आधीच केळी उत्पादक शेतकरी हा लॉकडाऊन नंतर नैसर्गिक आपत्ती चक्रीवादळ, अतिवृष्टी, तसेच केळी व्यापाऱ्यांकडून होणार्या आर्थिक लुटीमुळे प्रचंड वैतागलेला असून आज रोजी केळीला असलेला समाधानकारक भाव व हातात येणारे उत्पन्न यांच्याकडे पाहून केळी उत्पादक शेतकरी थोडय़ाफार प्रमाणात सुखावला होता परंतु त्याच्या या आनंदावर विरजण टाकण्याचे काम महावितरण कंपनीकडून करण्यात येत असल्याचे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ विवेक सोनवणे यांनी म्हटले आहे. त्याच्या बिकट परिस्थितीत हाता तोंडाशी आलेला उत्पन्नाचा घास जळगाव जिल्ह्यात विद्युत कंपनीने सुरू केलेल्या झिरो लोडशेडिंगमुळे हिरावला जाण्याची दाट शक्यता दिसून येत जर लोडशेडिंग अशीच सुरू राहिली तर अपुऱ्या वीजपुरवठ्याअभावी पाणि खंडित झाल्यामुळे केळी पिकावर याचा दुष्परिणाम दिसू लागलेला आहे व शासन व प्रशासन बघ्याची भूमिका घेऊन कागदी घोडे नाचवत आहे एक प्रकारे जिल्हा प्रशासनाने शेतकर्यांशी सूडबुद्धीने वागून शेतकर्यांना वाऱ्यावर सोडल्याचे शेतकर्यांना जिह्यात वारंवार अनुभवास असल्याचा आरोप स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ विवेक सोनवणे यांनी केलेला आहे.
जिल्ह्यात सुरू असलेली झीरो लोडशेडिंग तात्काळ थांबून पूर्णवेळ सुरळीत विद्युत पुरवठा करण्यात यावा असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!