महाराष्ट्र

शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या मावळातील शिवभक्तांच्या टेम्पोला रावेत, येथे भरधाव कंटेनरची धडक..

मावळ तालुक्यातील शिलाटणे येथील हे युवक असून या अपघातात एकूण ३३ जण जखमी..

Spread the love

शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या मावळातील शिवभक्तांच्या टेम्पोला रावेत, येथे भरधाव कंटेनरची धडक..A speeding container collided with the tempo of Shiva devotees from Maval who had gone to bring Shiva Jyot.

आवाज न्यूज : रावेत प्रतिनिधी, १० मार्च.

शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या शिवभक्तांच्या टेम्पोला भरधाव कंटेनरची धडक बसल्याने भीषण अपघात झाला. ही दुर्दैवी घटना आज शुक्रवार (दि. १०) रोजी सकाळच्या सुमारास घडली. मावळ तालुक्यातील शिलाटणे येथील हे युवक असून या अपघातात एकूण ३३ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी काही गंभीर आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तिथीप्रमाणे, जयंतीनिमित्त शिलाटणे (ता. मावळ) येथील युवक मल्हारगड या ठिकाणी शिवज्योत आणण्यासाठी गेले होते. यावेळी शिवज्योत घेऊन घरी परतत असताना रावेत परिसरात आल्यावर मागून भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने या शिवभक्तांच्या टेम्पोला जोरदार धडक दिली.

 

या अपघातात एकूण ३३ जण जखमी झाले आहेत. जखमींवर पवना रुग्णालय, पायोनियर रुग्णालय व रावेत येथील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यापैकी काहीजण गंभीर जखमी आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!