ताज्या घडामोडी

शिराळा सखी मंच नाव नोंदणी उत्साहात सुरुवात.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी – शिराळा येथील आपला बझारच्या माडीवर काल (ता. 5) शिराळा सखी मंचाची नाव नोंदणी मोठ्या उत्साहात सुरू झाली. अध्यक्षस्थानी आपला बझार समुहाच्या अध्यक्ष सौ. सुनितादेवी नाईक होत्या. स्वागत व प्रास्ताविक महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सौ. साधना पाटील यांनी केले. शिराळा सखी मंच साठी 2022 पर्यंत 1500 महिलांचे संघटन झाले होते. वर्षभर विविध उपक्रम यशस्वीपणे राबवून शिराळा सखी मंच ने स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले. 2023 ला देखील महिलांनी तितक्याच उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं असे आवाहन सौ. नाईक यांनी केले. यावेळी तालुक्यातील नुतन महिला सरपंच अस्मिता पाटील (सागाव), शुभांगी कांबळे (कणदूर), स्वाती पाटील (बिऊर), सोनाली नायकवडी (चरण), रेश्मा लोहार (काळुंद्रे), शर्मिला माने (शिराळे खुर्द), बाळूबाई धामणकर (आरळा), शोभा गायकवाड (फुपेरे), शुभांगी कुरणे (चिखली) यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून अध्यक्ष सौ. नाईक यांच्या हस्ते सत्कार झाला. सौ. नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. मिनाक्षी पाटील, कल्पना गायकवाड, शुभांगी देसाई, वंदना यादव, विजया माने, अर्चना कदम, गौरी साळुंखे, सुप्रिया पाटील, वैशाली भुयेकर, शौलजा पाटील, राणी हिरवडेकर, हसिना मुल्ला, रुक्मीनी पाटील, मिनाताई बेंद्रे, अर्चना पाटील, नुतन साठे व सखी मंचच्या सदस्या उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!