ताज्या घडामोडी

समाजातील वंचित, उपेक्षित घटकांसाठी बारा बलुतेदार संघ विकासासाठी कार्यरत राहणार : रामदास सुर्यवंशी

Spread the love

कोकरुड /वार्ताहर
उपेक्षित वंचित घटकांसाठी बारा बलुतेदार संघ त्यांच्या विकासासाठी नेहमी कार्यरत राहील असे प्रतिपादन बाराबलुतेदार समाज विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी यांनी केले.
कोकरुड ता शिराळा येथील सामाजिक कार्यकर्ते व बारा बलुतेदार समाज विकास संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष बाबासो गणपती कदम यांच्या ३८ वा वाढदिवसानिमित्त बारा बलुतेदार समाज विकास संघाची पणुंब्रे वारुण व कोकरुड येथे गाव शाखा उद्घाटन करण्यात आले. यावेळी बारा बलुतेदार समाज विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष रामदास सुर्यवंशी, संघाचे राज्य सचिव राजेंद्र पडींत, शिराळा बाजार समितीचे सभापती सुजित देशमुख, विश्वासचे संचालक शिवाजी पाटील, विभागीय अध्यक्ष तुकाराम इंगळे,पै.तात्या इंगळे आदींच्या हस्ते करण्यात आले. सांगली जिल्हा उपाध्यक्ष संभाजी कांबळे, जिल्हा संपर्कप्रमुख पांडुरंग कारंडे, विभागीय अध्यक्ष तुकाराम इंगळे, सांंली जिल्हा सदस्य संजय गायकवाड,शिराळा तालुका अध्यक्ष आकाश आढाव, उपाध्यक्ष दिलीप सुतार शिराळा तालुका कार्याध्यक्ष विकास सुतार , वैैभव वाघमारे, रमेश पोतदार, बाजीराव घोडे, अनंत पोतदार, प्रकाश सुतार, भरत चव्हाण, संजय गायकवाड, बजरंग कदम, उमेेेश कदम, सुमित मोहिते, हरिदास मोहिते, पणुुंब्रेचे बापूराव झेंडे शामराव चव्हाण विकास विभुते राकेश सुतार वसंत रामोशी आदींसह बारा बलुतेदार समाज विकास संघाचे व नाभिक महामंडळाचे पश्चिम भागातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!