ताज्या घडामोडी

आदर्शमाता प्रतिष्ठान च्या वतीने कराड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचार्‍यांचा सत्कार

Spread the love

पाडळी केसे तालुका कराड येथील आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान च्या वतीने कराड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्पर त्याबद्दल सत्कार करण्यात आला.

कराड शहरामध्ये काल वीज वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. यावेळी जोराच्या वाऱ्याने कराड पंचायत समितीच्या जवळ असणारे एक वृक्ष वाऱ्याने कोसळले. या वृक्षामुळे विद्युत तारा तुटून खांबही वाकला. यामुळे कराड शहरातील दत्त चौक ते भेदा चौक आणि दत्त चौक ते छत्रपती शाहू महाराज पुतळा या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. हे कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बि आर पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर तात्काळ कर्मचाऱ्यांना सूचना देऊन होते पंचायत समिती समोर असलेले झाड बाजूला करून कराड दत्त चौक ते शाहू चौक आणि कराड दत्त चौक ते भेजा या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली या कार्यतत्परते बद्दल कराड शहरातून कराड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे कौतुक होत आहे.
या कराड शहरातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्पर ते बद्दल आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्यावतीने प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक पाडवी केसे ग्रामपंचायतीचे सदस्य आनंदा बडेकर, प्रतिष्ठानचे सदस्य संपतराव मोहिते, प्रतिष्ठान चे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ पत्रकार दिलीप महाजन, अनिल बडेकर, ज्येष्ठ पत्रकार सदाशिव खटावकर (माऊली), ऋषिकेश शिंदे उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बि. आर.पाटील म्हणाले, आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान चे कार्य खरंच कौतुक करण्याजोगी आहे, चांगल्याला चांगलं म्हणण्याची देखील मानसिकता असावी लागते, त्याला मनाचा मोठेपणाही दाखवावा लागतो. आणि तो मनाचा मोठेपणा आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांच्याकडे आहे त्याबद्दल मी प्रतिष्ठानचे कराड शहर पोलीस ठाण्याच्या वतीने धन्यवाद मानतो असे सांगून बी. आर. पाटील म्हणाले, प्रतिष्ठान नी अशी सामाजिक बांधिलकी सदैव जपावी आणि चांगल्या कामाच्या पाठीशी ठाम उभे राहावे, स्वागत व प्रास्ताविक कराड शहर पोलीस ठाण्याचे गोपनीय विभागाचे प्रशांत पाटील यांनी केले, तर आभार ऋषिकेश शिंदे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!