क्रीडा व मनोरंजन

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची बॉक्सिंग स्पर्धा

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी : बाळ तोरसकर

मुंबई, मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शारीरिक शिक्षण विभागातर्फे बॉक्सिंगची स्पर्धा आयोजित केली होती. सदर स्पर्धेच्या अंतिम फेरीचे सामने कलेक्टर कॉलनी, चेंबूर येथील महापालिका शाळेत आयोजित करण्यात आली होती.

महापालिका शाळांमध्ये बॉक्सिंग चे खेळाडू तयार व्हावे व बॉक्सिंग चा प्रचार प्रसार व्हावा यासाठी शारीरिक शिक्षण विभागाने मा. राजेश घाडगे सरांच्या मार्गदर्शनाखाली व मुंबई बॉक्सिंग असोसिएशनच्या माध्यमातून विशेष मोहीम राबवली होती.

या संपूर्ण स्पर्धेत महापालिका शाळांमधील एकूण ६०२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. आज झालेल्या अंतिम सामन्यानंतर बक्षीस वितरण समारंभाला सन्मा. उपशिक्षणाधिकारी श्री कितीर्वधन किरतकुडवे, अधिक्षका सायली सुवे, अधिक्षक श्री. निसार खान, वेटलीफटिंग मध्ये छत्रपती पुरस्कार प्राप्त प्राप्त श्री मनोज मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!