ताज्या घडामोडी

बोंबाबोंब आंदोलन पिक विमा कंपन्यांनी ॲक्शन मोडवर यावे- डॉ. ढगे

Spread the love

नेवासा भ्रष्टाचार निर्मूलन अण्णा हजारे प्रणित नेवासा शाखा यांच्यामार्फत पिक विमा कंपन्यांच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले याचे सविस्तर निवेदन नेवासा तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांना तालुका अध्यक्ष रामराव पाटील भदगलेडॉकरण सिंग घुले समर्थांचे अध्यक्ष पत्रकार कारभारी गरड प्रानानासाहेब खराडे कल्याणराव मुरूमकर एस आर शिंदे प्रभाकर शिंदे कृषी शास्त्रज्ञ डॉअशोकराव ढगे यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आले
याप्रसंगी बोलताना डॉक्टर अशोकराव ढगे म्हणाले की खरीप हंगामात परतीच्या पावसाने कपाशी सोयाबीन तसेच तूरया पिकांचे मोठे नुकसान केले आहे ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती नेवासा तालुक्यात उत्पन्न झाली आहे नेवासा तालुक्यातील 22 हजार शेतकऱ्यांनी 14हजार हेक्टर क्षेत्राचा पिक विमा उतरविला आहे पैसे भरलेले आहेत तथापि पिक विमा कंपन्यांनी कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई अद्याप पावे तो शेतकऱ्यांना दिली नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे त्यामुळे शेतकरी वर्गात भयंकर संतोष असून शेतकरी आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे पिक विमा कंपन्यांनी तातडीने ॲक्शन मोडवर यावे व कार्यवाही करावी अशी मागणी कृषी शास्त्रज्ञ डॉअशोकराव ढगे यांनी केली आहे कार्यवाही न झाल्यास पुढील आंदोलन अतिशय तीव्र होईल व याची जबाबदारी सर्व स्वीपिक विमा कंपन्या व शासनावर राहील असा गंभीर इशारा तालुका अध्यक्ष रामराव पाटील भदगलेयांनी दिला याप्रसंगी काही शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे पिक विमा भरल्याच्या पावत्या सादर केल्या व एक रुपयाही मिळाला नाही यासाठी आक्रोश केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!