ताज्या घडामोडी

तर..विनय कोरेना मिळणार साथ मनसेची कोल्हापूर

Spread the love

कोल्हापूर : (वर्षाराणी दुर्गे सरुडकर) मनसे आणि भाजपा यांची युती होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांना मनसेची साथ मिळणार आहे. शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 10 ते 15 हजार मतदार आहेत. जर भाजप आणि मनसेची युती झाली तर याचा फायदा आमदार विनय कोरे यांना होणार आहे. मनसेची ताकद म्हणावी तितकी शाहुवाडी -पन्हाळा मतदार संघात नाही. परंतु भाजपा- मनसे युती झाली तर मनसेला बळ मिळेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. आगामी होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये मनसेचे मतदान जर जनसुराज्य शक्तीच्या पारड्यात पडले तर जनसुराज्य शक्ती पक्षाला तिसऱ्या राजकीय शक्तीचा पाठिंबा मिळण्याचे संकेत आहेत. काँग्रेसचे नेते कर्णसिंह गायकवाड व माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचे पुत्र अमर पाटील यांचा पाठिंबा आधीच विनय कोरे यांना आहे. त्यात आता नव्याने म्हणजे मनसेची भर पडणार आहे. आगामी दोन वर्षात मतदार संघातील विकास कामाला विनय कोरे यांनी चालना देण्याची गरज आहे. पन्हाळा तालुका हा त्यांचा हक्काचा आहे. परंतु शाहूवाडी तालुक्यात त्यांना मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. हा तालुका हा मागास, दुर्ग म्हणून ओळखला जातो. अशा तालुक्यात विकासाची गंगा आणली तर त्यांना पुन्हा आमदारकी मिळू शकते. जरी तीन शक्तींची ताकद मागे असली तरी शाहूवाडीतील जनता विकासाला प्राधान्य देत आहे, हे अनेक निवडणुकात स्पष्ट झाले आहे. विनय कोरे यांना भाजपचे सरकार आले तर मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना 2024 सालची निवडणूक महत्त्वाची आहे. शाहूवाडी तालुक्यातील पूर्व भागाकडे त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी आहे. विनय कोरे यांनी शाहूवाडी तालुक्यातील पूर्व भागासाठी एक संपर्क कार्यालय खुले करावे, अशी मागणी मतदारांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!