आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (CBSE ),इंदोरी , मध्ये तालुकास्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळेचे आयोजन’.

दिनांक २४ जानेवारी रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (CBSE )इंदोरी मध्ये पंचायत समिती मावळ तर्फे तालुकास्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

Spread the love

‘चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (CBSE ),इंदोरी , मध्ये तालुकास्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळेचे आयोजन’.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २४ जानेवारी.

दिनांक २४ जानेवारी रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (CBSE )इंदोरी मध्ये पंचायत समिती मावळ तर्फे तालुकास्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस सुदाम वाळुंज, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मावळ, सुजाता शिंदे विस्तार अधिकारी पंचायत समिती मावळ व ज्योती लावरे विषय तज्ञ पंचायत समिती मावळ हे मान्यवर उपस्थित होते.

या कार्यशाळेला मावळ तालुक्यातील बहुसंख्य शिक्षकांनी उपस्थिती दर्शवली. तसेच तज्ञ मार्गादर्शक ही या कार्यशाळेस उपस्थित होते. कार्यकमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली.

शाळेतील विद्यार्थ्यांनी मल्लंखांब व जलदीप याचे चित्त थरारक प्रात्यक्षिके सादर केली. उपस्थित मान्यवर व शिक्षक सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सुदाम वाळुंज सर व सुजाता मॅडम यांनी शिक्षकांशी सुसंवाद साधला.

तसेच चैतन्य इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका हेमलता खेडकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व शिक्षकाचे स्वागत केले व शिष्यवृत्ती परीक्षांसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेने कार्यक्रमास लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. पसायदानाने कार्यशाळेची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!