ताज्या घडामोडी

मुरूम बिटमधून शिष्यवृत्ती परीक्षेत हर्षवर्धन आनंद देशट्टे प्रथम

Spread the love

मुरुम, ता. उमरगा, ता. ५ (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इंदिरानगर आलूर येथील शिष्यवृत्ती धारक हर्षवर्धन आनंद देशट्टे या विद्यार्थ्याचा शाळेतर्फे सत्कार गुरुवारी (ता. ५) रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केसरजवळगा केंद्राचे केंद्रप्रमुख संतोष बोडरे यांच्या हस्ते मुरूम बिटमधून प्रथम आणि तालुक्यातून द्वितीय क्रमांक आल्याबद्दल शाळेच्या वतीने हर्षवर्धनला फेटा, शाल, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तस्लिम मुल्ला, शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती आईनलावर एल. एस., सहशिक्षिका के. एस. डिगरे आदींची उपस्थिती होती. केंद्रप्रमुख संतोष बोडरे यांनी अधिकचे ज्ञान वाढविण्यासाठी जास्तीत-जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षेस बसवण्याचे आवाहन केले. या यशाबद्दल हर्षवर्धनचे सर्वत्र कौतुक केले. सूत्रसंचालन के. एस. डिगरे यांनी केले तर आभार आईनलवार एल. एस. यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!