ताज्या घडामोडी

आठघराणे बलेकरवाडीची भागीबाय साश्रृनयनाने अनंतात विलीन.

Spread the love

आठघराणे बलेकरवाडी येथील कै. भागीरथी मनोहर बलेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज आकस्मिक निधन झाल. अचानक आम्हाला सोडुन गेल्याने सर्व बलेकर परीवाराला धक्काच बसला.
म्हणतात ना जो आवडतो सर्वाना तोची आवडे देवाला असच घडल. लाडाने आणि आदराने सर्वजण तिला भागीबाय अशीच हाक मारत. वाडीतील माणुस दिसला नाही तर नेहमीच त्याची चौकशी चालू. जेव्हा दिसेल ती व्यक्ती तेव्हा ति समाधानी होणारी. सर्वाची काळजी घेणारी कोणीही घरी आला तर त्याला चहा आणि पाणी दिल्याशिवाय पाठवणारच नाही. अशी लाडकी आमची भागीबाय आज आम्हा बलेकर परीवाराला सोडून अनंतात विलीन झाली.
८१ वर्षाची आमची भागीबायचा रुबाब तिची सवय आणि दुसऱ्या माणसाबद्दल असणारी तळमळ आम्हा तरुणांना प्रेरणा देणारी होती. तिच्याकडुन आम्ही खुप शिकलो. अशी भागीबाय पुन्हा जन्माला यावी हीच मनोकामना.
भागीबायच्या जाण्यान सर्व बलेकर परीवार आणि नाते परीवार दुखी झाला आहे.तिच्या जाण्यान वाडीमध्ये बारा दिवसाचा दुखवटा पाळला आहे.भागीबायच्या पश्चात तिन मुलगे एक मुलगी, नातवंडे आणि बलेकर परीवार आहे. अश्या आमच्या लाडक्या भागीबायला साश्रृनयनाने भावपूर्ण श्रध्दांजली वाहून दुखमय वातावरणात देवाने अनंतात विलीन केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!