ताज्या घडामोडी

कविता माणुसकीची हाक असते- प्रा. डॉ‌ .रामदास नाईकनवरे

Spread the love

कविता ही माणुसकीची ओढ असते, उत्कृष्ट जीवन जगण्याची प्रेरणा कविता देते, कविता वास्तवाचा रस्ता दाखवते, आत्मभान ठेवून कवितेकडे पाहिले पाहिजे, कविचा प्रवास प्रगल्भतेकडे झाला पाहिजे .कवीने आत्मनिष्ठ न बनता समाज हिताचे लेखन केले पाहिजे, अनुकूल आणि प्रतिकुल उत्कर्ष- अपकर्ष कवीतेतुन उमटला पाहिजे , नवविचाराचे जागरण कवितेमधून घडले पाहिजे . म्हणून कविता माणुसकीची हाक असते असे विचार कवितेचे अभ्यासक
प्रा. रामदास नाईकनवरे यानी मांडले. राधा- राम कृष्ण बापट मुक्तांगण वाचनालयात महात्मा गांधी, लाल बहादुर शास्त्री आणि ग. दि. माडगूळकर यांच्या जयंतीनिमित्त घेतलेल्या कवी संमेलनात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. रघुराज मेटकरी यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर अँड सुभाष पाटील, ज्येष्ठ साहित्यिक आनंदराव पाटील, प्रा. विश्वनाथ गायकवाड, उतमराव चोथे उपस्थित होते, यावेळी बालकवी श्रीवर्धन मेटकरी यांनी झुळूक सानुकली कविता सादर केली. अरविंद चांडोले यांनी रस्ते अविचल असतात मार्ग दाखवतात ही कविता सादर केली. प्रा. सुनील दबडे यांनी पाना पाना आड फुलत रहावे नवचैतन्याने बहरत रहावे हे कवितेतून सांगितले .सुधीर इनामदार यांच्या गजलेला रसिकांनी प्रतिसाद दिला तुमचा होता पंचाबापू| त्याचे झाले अस्वल झब्बे| अहिंसेच्या अंगावरती रोज उठू लागले धब्बे| अहिंसेच्या पुजाऱ्याचा हिंसेमधूनही अंत झाला | इथला प्रत्येक चांगला माणूस मेल्यावरती संत झाला | या गजलेला लोकांनी प्रसाद दिला प्रा. संताजी देशमुख यांच्या झुंजघे मानवा परवा नको कुणाची| रावणाचा राम करणे |तुला उसत नको उद्याची| ही कविता दाद मिळवून गेली.
तर शिराज शिकलगार म्हणाले खोट्याचं वलग्ननानी झिजवू नकोस अधरा| बापूस मान तो तर घालू नकोस सदरा | यावेळी अँड सुभाष पाटील ,एम बी जमादार , सागर गोतपागर रानकवी सुधो मोहिते, अशोक पवार, प्रा विश्वनाथ गायकवाड ,अनिल पाटील बोरगावकर रलकुमार नरुले ,गणेश जाधव , निवांत कवळे ,सौ. वृषाली कुलकर्णी शैलजा भिंगारदेवे ,हरिभाऊ कुलकर्णी या च्या कवीताना रसिकानी भरभरून दाद दिली डॉ. प्रकाश जाधव यानी गदिमा च्यां आठवणी सांगीतल्या त्यानी वाचनालयास आपले ग्रंथ भेट दिले. उतमराव चोथे यानी आपल्या आठवणी सांगून जूना काळ उभा केला .यावेळी प्रकाश कदम, योगेश्वर मेटकरी ,अभिजीत निरगुडे ,तात्या साहेब शेंडगे, राजू गारोळे,डॉ ऋषिकेश मेटकरी ,सौ वैशाली कोळेकर,सौ चंदना तामखडे ,सौ सुनिता पवार इत्यादी रसिक श्रोते व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते .अरुण लंगोटे यानी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!