ताज्या घडामोडी

रिध्दी सिध्दी पतसंस्थेचे महाव्यवस्थापक अशोक पाटील यांचा सत्कार

Spread the love

कोकरुड/ वार्ताहर
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून उपसरपंच प्रमोद पाटील यांच्या संकल्पनेतून पंधरा ऑगस्टला रोजी खिरवडे ता.शिराळा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील गुणवंत व्यक्ती व पदाधिकारी यांनी आप आपल्या क्षेत्रात नाव कमवून गावचा नावलौकिक वाढविला अश्या सर्व आज- माजी सरपंच, उपसरपंच सरपंच,सदस्य, विकास सेवा सोसायटी आजी-माजी चेअरमन, व्हा.चेअरमन, ,सदस्य,गावातील प्रमुख मान्यवर मंडळींचा ‌ तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा सन्मानपत्र देऊन यथोचित गौरविण्यात करण्यात आला. या कार्यक्रमास खिरवडे गावचे सन १९६४ सालचे प्रथम सरपंच मारुती हरी पाटील , सन १९८६ सालचे श्रीपती तानाजी पाटील , श्रीी रिद्धी सिद्धी पतसंस्थेचे अध्यक्ष मनोहर पाटील,वन खात्याचे आनंदा विष्णू पाटील ,आकाराम कृष्णा पाटील , ग्रामसेवक चंद्रकांत शिंदे,आदींसह ग्रामस्थ, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रारंभी स्वागत कार्यक्रमाचे विद्यमान उपसरपंच प्रमोद पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!