आरोग्य व शिक्षणक्राईम न्युजताज्या घडामोडी

खळबळजनक! इयत्ता बारावीचा ‘हा’पेपर फुटला ; कोचिंग क्लासच्या शिक्षकाला अटक

Spread the love

मुंबई : सध्या सुरू असलेल्या इयत्ता बारावीचा राज्य बोर्डाचा केमिस्ट्री (रसायनशस्त्र) विषयाचा पेपर फुटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. खाजगी कोचिंग क्लास घेणा-या शिक्षकांनी हा पेपर फोडल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आले आहे. त्यामुळे मालाड येथील या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.

 

मुकेश यादव असे विलेपार्ले पोलिसांनी अटक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

या शिक्षकांनी स्वतःच्या क्लास मधील तीन विद्यार्थ्यांना व्हाट्सअपवर रसायनशास्त्राचा पेपर पाठवला. परीक्षा होण्यापूर्वी पेपर विद्यार्थ्यांना मोबाईल वर देण्यात आला असे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.

हा पेपर आणखी किती जणांना मिळाला? केवळ हा पेपर फुटला कि इतर विषयांचे ही पेपर फुटले? या शिक्षकाला हे पेपर कुठून व कसे मिळाले? या सर्व प्रश्नांची उत्तरे अजून अनुत्तीर्ण आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!