ताज्या घडामोडी

चेंबूरमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने पहिल्या क्लिनिकचे भूमिपूजन संपन्न

Spread the love

मुंबई- राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबई महापालिकेच्यावतीने तसेच बेस्ट समिती चे माजी अध्यक्ष,मा.नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या विशेष प्रयत्नाने चेंबूरच्या घाटले गाव परिसरातील खारदेवनगर म्युनिसिपल शाळेजवळ एचबीटी क्लिनिक अर्थात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्लिनीक च्या कामाचे भूमिपूजन नुकतेच थाटात संपन्न झाले

चेंबूरमध्ये पालिकेच्या वतीने उभारले जाणारे हे पहिले क्लिनिक आहे.या क्लिनिकचा परिसरातील गरीब,गरजू रुग्णांना चांगला फायदा होणार असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पुढील स्मृतिदिनापर्यंत या क्लिनिकचा लोकार्पण सोहळाही पार पडणार आहे. या क्लिनिकच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विभागप्रमुख मा.नगरसेवक मंगेश सातमकर,एम वॉर्ड पालिका आरोग्य विभाग अधिकारी पुजा देसाई, नवाकाळचे उपसंपादक शंकर कडव, घाटला आरोग्य केंद्र अधिकारी आवळे मॅडम, महिला विभाग संघटिका रिताताई वाघ,विभाग संघटक संजय नटे, उपविभाग प्रमुख महेंद्र नाकटे,मा.उपविभाग प्रमुख अशोक माहूलकर,महिला उपविभाग संघटिका सुलभा पात्याने,शाखाप्रमुख उमेश करकेरा,शेखर चव्हाण, राजेश दौंडकर,सचिन भोसले,महिला शाखा संघटीका योगिता म्हात्रे, समाजसेविका मिनाक्षी पाटणकर,मा.महिला शाखा संघटीका अनिता महाडिक, मा.महिला शाखा संघटीका वैशाली कदम, महिला शाखा समन्वयक गिताताई पालव, युवासेना शाखा अधिकारी विनय शेट्ये तसेच पालिका अधिकारी, शिवसेना – युवासेना महिला,पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!