ताज्या घडामोडी

तीन गुण मिळवून कॅरम लवर्स संघ आघाडीवर

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी : बाळ तोरसकर

रत्नागिरी, रत्नागिरीच्या हॉटेल विवेक येथे भारतीय आयुर्विमा महामंडळ, इंफिगो, ओ एन जी सी व क्रिस्टल पुरस्कृत रत्नागिरी लीग सीजन ५ ला काल सायंकाळी सुरुवात झाली. उदघाटक आमदार उदय सामंत यांनी याप्रसंगी सर्वांचे स्वागत करून यापुढेही या स्पर्धेसाठी रत्नागिरी कॅरम असोसिएशनच्या पाठीशी उभे राहून कॅरम या खेळाला सर्वतोपरी मदत करण्याचे सांगितले. पहिल्या लीग फेरीतच व्हिक्टोरिअन्सच्या विश्व् विजेत्या प्रशांत मोरेने आपल्या २ व्हाईट स्लॅम व १ ब्लॅक स्लॅमची नोंद करत कॅरम लवर्सच्या के. श्रीनिवासवर २५-८, २५-२० अशी मात केली. दुसऱ्या सेटमध्ये ८ बोर्डानंतर २०-२० अशी सामान गुणसंख्या झाली. यानंतर नाणेफेकीचा कौल प्रशांतच्या बाजूने लागला व त्यांनी आपल्या दुसऱ्या व्हाईट स्लॅमची नोंद केली. तर दुसरीकडे कॅरम लवर्सच्या अभिषेक चव्हाण व कल्पेश नलावडे जोडीने व्हिक्टोरिअन्सच्या अनिल मुंढे व गिरीश तांबे जोडीवर २०-१०, १५-२३ व २३-९ विजय मिळवून सामन्यात बरोबरी साधली. तिसऱ्या सामन्यातही कॅरम लवर्सच्या महम्मद अरिफ व राहुल सोळंकी जोडीने व्हिक्टोरियन्सच्या रियाझ अकबर अली व गणेश तावरे जोडीवर २५-२, २५-७ अशी मात करत आपल्या संघाला २-१ असा विजय मिळवून दिला. दुसऱ्या सत्रात वाय सी सी हिटर्सने सिंधुदुर्ग फयटर्सवर २-१ असा विजय नोंदविला. त्यांच्या राष्ट्रीय विजेत्या अब्दुल रेहमानने झैद अहमदला २५-७, १-२५ व २४-५ असे नमविले. तर वाय सी सी कॅरम हिटर्सच्या यासिन शेख व राजू भैसारे जोडीने सिंधुदुर्ग फायटर्सच्या योगेश धोंगडे आणि वी आकाश जोडीवर २०-२५, २५-१५ व २१-१४ अशा विजयाची नोंद केली. तिसरा आणि एकमेव सामना सिंधुदुर्ग फायटर्सने जिंकला. त्यांच्या अभिजित त्रिपनकरने के. रमेश बाबूवर २३-११, २४-१३ अशा विजयाची नोंद केली.

दुपारच्या तिसऱ्या सत्रात लायबा कॅरम मास्टर संघासमोर यंगस्टरने सपशेल नांगी टाकली. लायबाच्या खेळाडूंनी ३-० असा एकतर्फी विजय मिळविला. लायबाच्या खेळाडूंनी अनुक्रमे विकास धारियाने संदीप दिवेकर १६-४, १३-९ तर जुगल किशोर दत्तने इर्शाद अहमदवर २४-१६, १७-११ आणि संदीप देवरुखकर व निसार शेख जोडीने पंकज पवार व रहीम खान जोडीवर २५-१९, २५-० अशा विजयाची नोंद केली. याच सत्रात कॅरम लव्हर्सच्या संघाने सत्यशोधक स्ट्रायकर्सवर २-१ अशा विजयाची नोंद केली. कॅरम लवर्सच्या खेळाडूंनी अनुक्रमे महम्मद अरिफवर २५-१२, २५-२ तर के. श्रीनिवासने योगेश परदेशीवर २५-६, १५-२१ व २५-८ अशा विजयाची नोंद केली. सत्यशोधक स्ट्रायकर्सच्या एल सूर्यप्रकाश व अहमद सय्यद जोडीने कॅरम लवर्सच्या राहुल सोळंकी व अभिषेक चव्हाण जोडीवर २५-२०, १९-१५ अशा एकमेव विजयची नोंद केली.
तिसऱ्या फेरीनंतर ३ गुण मिळवून कॅरम लवर्स संघ आघाडीवर आहे.
वाय सी कॅरम हिटर्स १ गुण
यंगस्टर्स १ गुण
सिधुदुर्ग फायटर्स २ गुण
लायबा कॅरम मास्टर्स २ गुण
कॅरम लव्हर्स ३ गुण
व्हिक्टोरिअन्स ० गुण
सह्याद्री स्ट्रायकर्स १ गुण
सत्यशोधक स्ट्रायकर्स २ गुण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!