महाराष्ट्र

बारा बलुतेदार व ओबीसीच्या विविध मागण्याबाबत उपमुख्यमंत्र्यानी घेतली बैठक

Spread the love

आवाज न्यूज : ओबीसी व बारा बलुतेदार समाजाच्या विविध मागण्याबाबत लवकरच मंत्रालयात बैठक घेत त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारा बलुतेदार संघाचे प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी यांच्या शिष्टमंडळास मागील आठवड्यात दोन वेळा झालेल्या भेटीत दिले होते. त्याप्रमाणे काल मंत्रालयात बैठकीचे आयोजन मुख्यमंत्री मा उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते.

यावेळी काॅग्रेसचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,ओबीसी नेते छगन भुजबळ,बहुजन मंत्री विजय वडेट्टीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई,नगरविकास मंत्री सुभाष देसाई,मुख्य सचिव देवाशिष चक्रवती,मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे उपस्थित होते.

बैठकीत झालेले निर्णय
1)ओबीसी आरक्षण लवकरच पूर्ववत करणे व त्यासाठी कालबध्द कार्यक्रम आयोगाने आखावा व कार्यवाही करावी असे आदेश.
2)आयोगाने इम्पीरिएल डाटा लवकर सादर करावा.
3)आयोगाला आॅफीस व कार्यालय आणि निधी दिला जाईल.
4)ओबीसी व बारा बलुतेदारांना बजेट दिले जाईल.
5)इतरही मागण्याबाबत चर्चा यावेळी झाली.

बारा बलुतेदार समाज विकास संघाच्यावतीने शिष्टमंडळाने वरील मागण्या प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी व रा काॅ.पा.चे शहर सरचिटणीस उदयसिंह मुळीक यांनी केल्या होत्या.त्याला शासनाने प्रतिसाद दिल्याबद्दल शासनाचे आभार बारा बलुतेदार संघातर्फे रामदास सूर्यवंशी,सचिव राजेंद्र पंडित यांनी मानले.

याप्रसंगी रोहित यवतकर-उत्सवप्रमुख,सचिन उदावंत-संपर्कप्रमुख,माऊली रायकर-संघटनमंत्री,चंद्रशेखर जावळे-प्रदेश कार्य.सदस्य,प्रशांत गायकवाड-प्रसिध्दीप्रमुख ,राजेश भोसले-शहराध्यक्ष पुणे,हेमंत श्रीखंडे-शहराध्यक्ष पि चि,सुनील पांडे,नितीन पंडित,सुनील शिंदे,उदय दैठणकर,प्रकाश क्षीरसागर,रवि मावडीकर,परशुराम काशीद,बालाजी तिरमकदार,चंद्रकांत बावीस्कर,संजय चव्हाण,डाॅ.राधेशाम जयस्वाल,उध्दव कावरे,बाबासाहेब कदम,युवराज गायकवाड,विशाल वाळुंजकर,सत्यनारायण उदावंत,संदिप बोंदरवाल,गणेश वाळुंजकर,विनायक गायकवाड,निवृत्ती बोकन,प्रशांत झणकर,नंदकुमार राऊत,नाना आढाव,सचिन पंडित,नागेश भोपुलकर,रमेश कोतवाल,राजेश गायकवाड,विजय तावरे,राजेश दळवी,दत्तात्रय तारू,राजेंद्र मगर,चेतन मोरे,अर्जुन राऊत,रायभान पाटेकर,मंगेश डाखवे,किशोर पवार,चेतन वेळीस,विजय तिकोने,सुनील रसाळ,उत्तम मंडलीक,सुजीत मगर,निलेश सैंदाणे,शुभम क्षीरसागर,तानाजी कांबळे,हर्षद जाधव,संजय पाचेरकर,अनिल अगावणे,नंदकुमार सुतार,कुंडलीक काशीद,सुनील पवार,राजेंद्र लोणकर,संपतराव ठोंबरे,सूर्यकांत भोसले,नितीन भुजबळ,बालाजी अपुणे आदींनी आनंदोत्सव व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!