आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती महाराष्ट्र मातंग समाज मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य व नेञतपासणी शिबीराने साजरी ..

" लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे समाजासाठी उत्तुंग मोठे कार्य आहे.महाराष्ट्र राज्य निर्मिती साठी त्यांनी अनेक शाहिरी रचना केल्या. अनेक कादंबऱ्या लिहून समाजासाठी राज्यातील साहित्य समृद्ध केले..माजी उपनगराध्यक्ष आर.डी.जाधव

Spread the love

 सामाजिक.. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती महाराष्ट्र मातंग समाज मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य व नेञतपासणी शिबीराने साजरी ..

आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी ४ ऑगस्ट,

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती महाराष्ट्र मातंग समाज मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य व नेञतपासणी शिबीराने साजरी करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष , माजी उपनगराध्यक्षा , माजी नगरसेवक आदींनी यावेळी उपस्थित राहून शिबीरात सहभाग घेतला.
सोमवारी ता.१ रोजी सकाळी शिबीर झाले ;तर सायंकाळी भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात येवून आण्णाभाऊ साठे यांची जयंती लोणावळा शहरात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली . तसेच येथील मातंग समाजाचे माजी सभासद राजू वसंत साबळे यांच्या स्मरणार्थ साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिर व नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिर हे मंडळांनी आयोजित केले होते.

यावेळी आण्णाभाऊ साठे यांचे गाव सांगली येथील वाटेगाव येथून लोणावळा शहर मातंग समाजाचे अध्यक्ष सोमनाथ भाऊ बोभाटे , उपाध्यक्ष विकास साठे , कार्याध्यक्ष विजय साबळे मंडळाचे सेक्रेटरी तसेच गणेशोत्सव जयंती महोत्सवाचे अध्यक्ष आनंद बोभाटे यांचे नेतृत्वाखाली आणि उप सेक्रेटरी , अभय लोंढे आदी असंख्य कार्यकर्त्यांनी ज्योत आणली.
यावेळी मंडळाचे खजिनदार उदय बोभाटे , अभिजीत फाजगे तसेच मंडळाचे वरिष्ठ नाना रोकडे, अशोक दादासाहेब बोभाटे सभासद तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महर्षी वाल्मीक समाज अध्यक्ष विक्रम सारवान , उपाध्यक्ष विकी ऊठवाल , चेतन सारवान व जय पाटोळे , श्रेयस कांबळे, बाळू बोभाटे , महेंद्र शिंदे, शाम बोभाटे, शब्बीर शेख आदी उपस्थित होते.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष आर.डी.जाधव भाषणात म्हणाले , ” लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे समाजासाठी उत्तुंग मोठे कार्य आहे.महाराष्ट्र राज्य निर्मिती साठी त्यांनी अनेक शाहिरी रचना केल्या. अनेक कादंबऱ्या लिहून समाजासाठी राज्यातील साहित्य समृद्ध केले..त्यांचे नाव आम्ही झोपडपट्टीला दिले आहे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे नावाने ग्रंथालय व वाचनालयास मी आर्थिक मदत देण्याचे अश्वासनाची देतो.
मातंग समाज मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून माजी नगरसेवक निखिल कविश्वर , माजी नगरसेविका आरोही तळेगावकर यांचेतर्फे लोकशाहीर आण्णाभाऊ यांचे नावाने ग्रंथालय सुरू केल्यास देणगी देण्याचे अश्वासन दिले.
माजी नगराध्यक्ष अमित गवळी या मोफत शिबीराचे कौतुक करून ते म्हणाले , मी पुढील वर्षी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे गावावरून ज्योत आणण्यासाठी सर्व खर्चाचा भार असंघटित कामगार संघटनेमार्फत उचलण्याचे अश्वासन देतो तसेच ग्रंथालयासाठी आर्थिक मदत करतो , असे भाषणात सांगितले .

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष भरत चिकणे , वकील संकेत शिंदे , आणि रमेश म्हाळसकर , श्री जोशी यांचेकडून लोकशाहीर आण्णाभाऊ व छञपती शाहु महाराज यांचे प्रतिमेला पुष्पहार आर्पण करण्यात आला.
यावेळी शिबीरास उद्योजक राजूशेठ सोनवणे , तसेच प्रविण कांबळे ,भाजप युवामोर्चा पदाधिकारी विजय सकट , यांनीही भेट दिली.

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस आय , राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महर्षी वाल्मीक समाज, बौद्धजन सेवा संघ अशा अनेक राजकीय पक्ष संघटनेने सहभागी होऊन चांद तारा कमिटी, अशा अनेक मंडळांनी राजकीय पक्षांनी तसेच सामाजिक संघटनेने सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली..यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती.

शहर मातंग समाजाचे अध्यक्ष सोमनाथ बोभाटे , उपाध्यक्ष विकास साठे , कार्याध्यक्ष विजय साबळे मंडळाचे सेक्रेटरी व गणेशोत्सव जयंती महोत्सवाचे अध्यक्ष आनंद बोभाटे , उप सेक्रेटरी , अभय लोंढे , खजिनदार उदय बोभाटे , अभिजीत फाजगे , नाना रोकडे, अशोक दादासाहेब बोभाटे , महर्षी वाल्मीक समाज अध्यक्ष विक्रम सारवान , उपाध्यक्ष विकी ऊठवाल , चेतन सारवान व जय पाटोळे , श्रेयस कांबळे, बाळू बोभाटे , महेंद्र शिंदे, शाम बोभाटे, शब्बीर शेख आदींनी शिबीर व मिरवणूक यासाठी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!