ताज्या घडामोडी

पुण्यश्लोक फाउंडेशन महाराष्ट्राच्या वतीने चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

Spread the love

होळकर घराण्याचे माननीय युवराज यशवंत राजे होळकर (तृतीय) यांची या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होती

यावेळी मुंबई भूषण पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात आला..यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन

मुंबई: (दि.१३) पुण्यश्लोक फाउंडेशन महाराष्ट्राच्या वतीने चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये मुंबई भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चक्रवती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर जन्मोत्सव दिनानिमित्त धनगर समाजातील अनेक नेते उपस्थित होते. धनगर समजतील अनेक संघटना एकत्र आल्या होत्या…

यावेळी या कार्यक्रमास माजी मंत्री तथा विधानपरिषद सदस्य प्रा.राम शिंदे, माजी राज्यसभा खासदार तथा पद्मश्री डॉ.विकास महात्मे, माजी विधानपरिषद सदस्य रामराव वडकुते, माजी विधानपरिषद प्रकाश अण्णा शेंडगे, माजी विधानपरिषद सदस्य रमेश भाऊ शेंडगे, सरसेनापती जय मल्हार सेना लहुजी शेवाळे, मल्हार आर्मी सुरेश भाऊ कांबळे, संस्थापक सम्राट मौर्य सेना अर्जुन सलगर, संचालक (अभियांत्रिकी) मुंबई महानगरपालिका लक्ष्मण व्हटकर, कार्यक्रमाचे संयोजक संस्थापक पुण्यश्लोक फाऊंडेशन तथा संपादक धनगर माझा धनंजय तानले, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सेवानिवृत्त क्रीडा उपसंचालक एन.बी. मोटे ,सिडको युनियन लिडर अनिल राऊत ,डॉ.प्रसाद कारंडे, सागर नाझीरकर ,भारत कवितके,योगेश राऊत, जालिंदर सरोदे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश येडगे, युवा पत्रकार जनार्दन येडगे , सिद्धार्थ महाविद्यालय प्राध्यापक बापू वाघमोडे, राज बंडगर, साईनाथ बंडगर धनाजी धायगुडे, समाजसेवक गजानन खरात, राजू जांगळी , प्रकाश कोकरे, समीर आखाडे, सुनील झोरे, विकास झोरे, किरण जरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती…

पुरस्काराचे मानकरी:-

कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय ,औद्योगिक, सांस्कृतिक, उद्योजक, शैक्षणिक या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लेसर दंत चिक्तिसक -डॉ.विशाल मदने, उद्योजक -हिरालाल पाल, शिक्षक- शिवाजी शेंडगे, संस्थापक ज्ञानमंदिर हायस्कूल संस्थापक इंजिनीयर अनिल झोरे, पत्रकार ॲड. इरबा कोणापुरे, सी एस आर लीडर दादासाहेब सरगर, नव जागृती सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका डॉ. स्मिता काळे, नागोबा फाउंडेशन ट्रस्टी कू. आकांशा शंकर विरकर, व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते निलेश मोटे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सुभाष शिंदे
यांना मुंबई भूषण पुरस्काराने सन्मानित वैभवशाली होळकर घराण्याचे वंशज युवराज यशवंत राजे होळकर ( तृतीय) यांचे हस्ते करण्यात आले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!