ताज्या घडामोडी

पोलिस उपनिरीक्षक डी. आर. जाधव ‘ठाणे गौरव’ने सन्मानित

Spread the love

कोकरूड:/वार्ताहर
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक, राष्ट्रपती पुरस्कार विजेते डी. आर. जाधव यांना ‘ठाणे गौरव’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे हा कार्यक्रम
संपन्न झाला. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे व आमदार रवींद्र फाटक,महापौर नरेश मस्के, आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या हस्ते डी. आर. जाधव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेता अशोक वैती, स्थायी समिती सभापती संजय भोईर, विरोधी पक्षनेता अशरफ पठाण, क्रीडा समितीच्या सभापती प्रियांका पाटील, डी. आर. जाधव यांच्या पत्नी सौ.संगीता जाधव आदी उपस्थित होते.डी. आर.जाधव यांना ‘ठाणे गौरव’ पुरस्काराने सन्मानित करताना आमदार रवींद्र फाटक,महापौर नरेश मस्के, आदी मान्यवर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!