आपला जिल्हा

शांतिदूतपरिवार- पदाधिकारी- सदस्य आणि हितचिंतक यांची राज्यस्तरीय बैठक पुण्यात संपन्न.

आषाढीवारीचे औचित्य साधून पुणेस्थित एन एम वाडिया हॉस्पिटलच्या प्रांगणातून दिंडीचा आरंभ करून सभागृहातील व्यासपीठावर स्थापित केलेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या भव्य पुतळ्याचे पूजन करून या दिंडीची सांगता होऊनच समारंभाची अतिशय प्रसन्न पवित्र अशी सुरुवात झाली.

Spread the love

शांतिदूतपरिवार- पदाधिकारी- सदस्य आणि हितचिंतक यांची राज्यस्तरीय बैठक पुण्यात संपन्न.The state level meeting of Shantidut Parivar – office bearers – members and well-wishers was held in Pune.

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, २८ जुन.

राष्ट्रभक्ती- शांतता- धार्मिक सलोखा-मानवी सेवा- निसर्गसेवा या विविध मानवी मूल्यांची जपणूक करण्याच्या उद्देशाने मानवीसेवेचे उद्दिष्ट समोर ठेवून- मार्गदर्शक डॉक्टर विठ्ठल जाधव{ विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य -सेवा-नि} यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली जनसेवेची ही पालखी चार वर्षापासून निघालेली आहे.  विद्याताई विठ्ठल जाधव{ संस्थापक अध्यक्ष} यांची अत्यंत मोलाची साथ या शांतिदूत परिवाराला लाभलेली आहे.

आषाढीवारीचे औचित्य साधून पुणेस्थित एन एम वाडिया हॉस्पिटलच्या प्रांगणातून दिंडीचा आरंभ करून सभागृहातील व्यासपीठावर स्थापित केलेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या भव्य पुतळ्याचे पूजन करून या दिंडीची सांगता होऊनच समारंभाची अतिशय प्रसन्न पवित्र अशी सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या विविध विभागातून आपापल्या क्षेत्रात विलक्षण उंचीवर असलेल्या सर्व मान्यवरांचे- कार्यकर्त्यांचं स्वागत संस्थेच्या अध्यक्षा. विद्याताईनी केल्यानंतर प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर विठ्ठलराव जाधव यांनी प्रास्ताविक केले.

आपल्या मनोगतात संस्थेचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विविध क्षेत्रात अत्यंत मनापासून कार्यरत असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं सरांनी अभिनंदन केलं, कौतुक केलं आणि शाबासकीची थापही दिली.  शांतिदूत परिवाराच्या भविष्यकालीन प्रकल्पांच्या स्वप्नपूर्तीसाठी आमंत्रित अनुभव संपन्न मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्यात प्रामुख्याने- प्रसिद्ध उद्योगपती- रामदासजी माने- डॉक्टर व्यंकटसाई चलसानी- इंडस्ट्रियलिस्ट माननीय सुप्रियाताई बडवे_ आरतीताई कोंढरे- डॉक्टर मधुसूदन घाणेकर- डॉक्टर दत्ता कोहिनकर-  केशवजी कांबळे- विजय भोसले-  समृद्धी जाधव यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.

मावळ तालुक्याचे शांतिदूत परिवाराचे प्रतिनिधित्व करणारे तळेगाव स्थित जेष्ठ डॉक्टर शालिग्राम भंडारींनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की- मला आपल्या परिवारातील प्रत्येक तरुण हा तेजस्वी असावा, तत्पर असावा, तपस्वी असावा, त्याचे हात सर्व कामी- बुद्धी सर्वगामी आणि हृदय सर्वप्रेमी असावे. हा असा तरुण आपल्याला आयात करता येत नाही! तो विकतही घेता येत नाही तर तो निर्माण करायचा आहे! कारण जिथे जिथे अत्याचार आहे! अन्याय आहे अपघात आहेत- नैसर्गिक अडचणी आहेत! रक्तदान आरोग्य वगैरे शिबिरे आहेत- अशा विविध ठिकाणी हाच तरुण कार्यरत असतो! या आपल्या शांतिदूत परिवाराचा भक्कमकणा हा तरुणच आहे! म्हणूनच तो शारीरिक मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या भक्कम असणे आवश्यक आहे! यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचं अभिवचन डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केल.

या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन संयोजन आणि सूत्रसंचालन- उद्योजक- लेखक निवेदक -मुलाखत कार-  विजय बोत्रे यांच्या टीमने केल्यामुळे हा समारंभ एका विशिष्ट उंचीवर पोहोचला.  सभागृहातून बाहेर पडणाऱ्या पदाधिकारी आणि हितचिंतकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह हीच या बैठकीच्या यशस्वीतिची पावती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!