ताज्या घडामोडी

शिराळ्यात जिद्दी गणेश मंडळाचे विविध कार्यक्रम

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / शिराळा येथील जिद्दी गणेश मंडळांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या वृक्षारोपण व हळदी कुंकू कार्यक्रमास शेकडो महिलां उपस्थित होत्या.
सोमवार पेठ, शिराळा येथील जिद्दी गणेश मंडळास यावर्षी पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. याचे औचित्य साधून सदर मंडळांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर नुकत्याच झालेल्या हळदी कुंकू कार्यक्रमास मालती सुंदरी फेम अभिनेत्री सौ सोनाली नांगरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त उपस्थित शेकडो महीलांना प्रत्येकी एक झाड पुष्पगुच्छ व सुवासिनींचे वान म्हणून हळदी कुंकवाचा करंडा भेट देण्यात आला. तरी कुठेने गल्लीतील महिला यावेळी सौ सुवर्णा पाटील, रुपाली ल्हायकर, दिपाली शेवाळे, सुशिला कुरणे, माजी ग्रामपंचायत सदस्या कुसुम निकम, धनश्री कुरणे, मंगल कुरणे आदींसह भोई समाजाच्या महिला व कुरणे गल्लीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
तर यावेळी मंडळाच्या वतीने जेष्ट नागरीकांचा सत्कार करण्यात आला. शहरातसह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा संकल्प असून विविध समाजोपयोगी उपक्रम करण्यात येणार आला असल्याचे संयोजकांच्या कडून सांगण्यात आले.
सदर कार्यक्रमांचे आयोजन महेश पाटील, फिरोज मुजावर, अवधूत गायकवाड, अनिल पाटील, सुरज कुरणे, दिनेश सुरले, गोरख करणे, शुभम सुरले, सतिश पाटील, महादेव कुरणे यांच्यासह व्यापारी व सदस्यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!